एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Rakesh Gangwal : माजी विद्यार्थ्याची आयआयटी कानपूरला गुरू दक्षिणा; इंडिगो एअरलाइन्सच्या सह-संस्थापकाकडून 100 कोटींची देणगी

सोमवारी (4 एप्रिल) मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये राकेश गंगवाल (Rakesh Gangwal) यांनी ही रक्कम आयआयटी कानपूरला दिली.

Rakesh Gangwal : इंडिगो एअरलाइन्स (IndiGo Airline) चे सह-संस्थापक राकेश गंगवाल (Rakesh Gangwal) यांनी कानपूर(Kanpur)च्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरला 100 कोटींची देणगी दिली आहे. ही रक्कम स्कूल ऑफ मेडिकल सायन्स टेक्नॉलॉजीच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. सोमवारी (4 एप्रिल) मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ही रक्कम आयआयटी कानपूरला देण्यात आली. राकेश हे आयआयटी कानपूरचे माझी विद्यार्थी आहेत. ही रक्कम संस्थेच्या इतिहासातील माजी विद्यार्थ्याने दिलेली सर्वात मोठी आर्थिक मदत मानली जात आहे. 

कोलकाता येथील रहिवासी असलेले राकेश गंगवाल यांनी कोलकाता येथील डॅन बास्को स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. त्यांनी 1975 मध्ये आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. बीटेक केल्यानंतर पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए पूर्ण केल्यानंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. त्यानंतर त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.  राकेश गंगवाल सप्टेंबर 1980 मध्ये एअरलाइन उद्योगात रुजू झाले. 


Rakesh Gangwal : माजी विद्यार्थ्याची आयआयटी कानपूरला गुरू दक्षिणा; इंडिगो एअरलाइन्सच्या सह-संस्थापकाकडून 100 कोटींची देणगी

आयआयटीचे संचालक प्रा. अभय करंदीकर म्हणाले की, राकेश गंगवाल यांच्या आर्थिक मदतीमुळे आणि सामंजस्य करारामधून संस्थेत स्थापन होत असलेल्या स्कूल ऑफ मेडिकल रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या सुधारणेसाठी, संशोधन कार्याच्या चालना मिळण्यास मदत होईल. मुंबईमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये राकेश गंगवाल यांच्या सोबतच त्यांची पत्नी शोभा, मुलगा पारूल आणि आयआयटीचे उपसंचालक प्रा. एस गणेश, आयआयटी डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे सीईओ कपिल कौल, प्रा. कांतेश बालानी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. गंगवाल हे स्कूल ऑफ मेडिकल रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या सल्लागार मंडळात सामील होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget