एक्स्प्लोर
हवाई दलाचं फायटर प्लेन उडवण्यास महिला पायलट सज्ज
हैदराबाद : भारतीय हवाई दलात आज इतिहास घडणार आहे. पहिल्यांदाच तीन महिला पायलट आज हवाई दलाचं फायटर प्लेन उडवणार आहे. या तिन्ही महिला पायलटचं प्रशिक्षण पूर्ण झालं असून आज फायटर प्लेन उडवण्यास सज्ज झाल्या आहेत.
हैदराबादच्या इंडियन एअर फोर्स अकॅडमीतून भावना कंठ, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंह या तीन प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण संपवून आज भारतीय हवाई दलाच्या सेवेत सज्ज होत आहेत. हवाई दलाचं फायटर प्लेन उडवणाऱ्या या पहिल्याच महिला ठरणार आहेत.
'ऐतिहासिक संधीचं सोनं करणार'
प्रशिक्षण संपताच ही मोठी संधी मिळत आहे. चांगली महिला लढाऊ पायलट होऊन देशाला आणि माझ्या आई वडिलांना अभिमान वाटेल असं काम मी करेन, असं भावना कंठ यांनी सांगितलं. प्रशिक्षणाच्या काळात अभ्यासक्रमामध्ये अनेक चांगले अनुभव आले. वेगवेगळ्या अनुभवातून आत्मविश्वास चांगला वाढला आहे. त्यामुळे देशासाठी नक्कीच चांगलं काम करीन, असंही भावना कंठ म्हणाल्या.
प्रत्येक क्षणातून काही तरी शिकत राहायचं आहे, आणि देशासाठी महत्त्वाचं योगदान द्यायचं आहे, अशी भावना अवनी चतुर्वेदी यांनी बोलून दाखवली. करिअरच्या सुरुवातीलाच ही मोठी संधी मिळत आहे, त्यामुळे या संधीचं सोनं करुन महान पायलट बनणार असल्याचं चतुर्वेदी यांनी सांगितलं.
तिसरी प्रशिक्षणार्थी मोहना सिंह यांनी प्रशिक्षणादरम्यानचे अनेक किस्से बोलून दाखवले. हवाई दलाची पायलट झाल्यामुळे माझ्या आई-वडिलांना अभिमान आहे. देशासाठी योगदान द्यायचं आहे, असं मोहना सिंह यांनी सांगितलं. मोहना सिंह यांनी प्रशिक्षणादरम्यानचा नाईट फ्लाईंगचा किस्सा आठवणीने सांगितला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement