एक्स्प्लोर
दिल्लीचा भव्य सुनेजा इंडोनेशियाच्या अपघातग्रस्त विमानाचा पायलट
इंडोनेशियाच्या लायन एअरवेजचं जेटी 610 हे प्रवासी विमान समुद्रात कोसळलं. 188 जणांना घेऊन जाणारं हे प्रवासी विमान जकार्ताहून पन्गकल पिनांग इथे जात होतं.
नवी दिल्ली : इंडोनेशियातील लायन एअरवेजचं विमान आज उड्डाणानंतर काही मिनिटातच कोसळलं. महत्त्वाचं म्हणजे लायन एअरवेजचं बोईंग 737 जेटी610 हे विमान दिल्लीचे 31 वर्षीय वैमानिक भव्य सुनेजा उडवत होते. भव्य सुनेजा हे दिल्लीतील मयूरविहारचे रहिवासी होते. 2016 मध्येच त्यांचं लग्न झालं होतं.
इंडोनेशियाच्या लायन एअरवेजचं जेटी 610 हे प्रवासी विमान समुद्रात कोसळलं. 188 जणांना घेऊन जाणारं हे प्रवासी विमान जकार्ताहून पन्गकल पिनांग इथे जात होतं.
भव्य सुनेजा यांचं शिक्षण एल्कॉन पब्लिक स्कूलमधून झालं होतं आणि 2009 मध्ये त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला होता. यानंतर ते अमिरातमध्ये ट्रेनी होते. ते सात वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 मध्ये लायन एअरवेजमध्ये रुजू झाले होते. हरविनो हे त्यांचे सह-वैमानिक होते.
"भव्य सुनेजा यांना बोईग-737 उडवण्याचा चांगला अनुभव होता आणि एवढ्या वर्षात कोणताही अपघात झाला नव्हता. त्यांचा चांगला रेकॉर्ड पाहून त्यांना आमच्या टीममध्ये घेण्याबाबत आम्ही फारच उत्सुक होतो. फक्त दिल्लीत पोस्टिंग द्यावी, अशी त्यांची अट होती. 'इथले बहुतांश वैमानिक उत्तर भारतातील असून त्यांना दिल्लीमध्ये पोस्टिंग हवी असते. त्यामुळे एक वर्ष आमच्यासोबत काम केल्यानंतर दिल्लीत पोस्टिंग देण्याबाबच विचार केला जाईल," असं त्यांना सांगितल्याचं लायन एअरवेजच्या एका अधिकाऱ्याने नमूद केलं.
भव्यला 6000 तासांच्या तर को-पायलटला 5000 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. महत्त्वाचं म्हणजे हे नवं विमान होतं आणि दोन महिन्यांपूर्वी विमान सुरु करण्यात आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement