एक्स्प्लोर

Operation Sindoor: भारताचं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; ऑपरेशन सिंदूरद्वारे कोणकोणते दहशतवादी मारले गेले?, संपूर्ण यादी आली समोर

Operation Sindoor: एअर स्ट्राइकमध्ये अनेक दहशतवादी या एअर स्ट्राइकमध्ये मारले गेले आहेत. यात मसुद अजहरचा भाऊ रऊफ अजगर हा गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Operation Sindoor: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला आणि 26 जणांच्या मृत्यूचा बदला घेत भारताने आज (7 मे) पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करत चोख प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) या एअर स्ट्राइकमध्ये अनेक दहशतवादी या एअर स्ट्राइकमध्ये मारले गेले आहेत. यात मसुद अजहरचा भाऊ रऊफ अजगर हा गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कुख्यात दहशतवादी मसूर अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा झाला. मुंबईत झालेल्या 26/ 11 च्या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर (Masood Azhar) असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर मसूद अजहरचा अनेक मोठ्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता, अशी माहिती समोर आली आहे.

कोणकोणते दहशतवादी मारले गेले 

- लश्कर-ए-तैयबाचा महत्वाचा कमांडर खालिद मोहम्मद आलम या हल्ल्यात मारला गेला आहे. 
- धर्मांध इस्लामिक धर्मप्रसारक आणि कोटली दहशतवादी शिबिराचा मुख्य कमांडर कारी मोहम्मद इकबाल  मारला गेला आहे. 
- हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगर गंभीररित्या जखमी
- मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. 
- भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा मृत्यू झाला आहे.
- याशिवाय मौलाना मसूद अजहर याच्या परिवारातील एकूण १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
- लष्कर ए तय्यबाचे दहशतवादी वकास आणि हसन यांनाही कंठस्नान घालण्यात आलंय.
- लष्कर ए तय्यबाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल मलिक आणि मुदस्सिर यांचा खात्मा केला आहे.

कोण आहे मसूद अजहर? 

मौलाना मसूद अजहर हा जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे .2019 मध्ये भारतातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती .पुलवामाच्या हल्ल्यात भारताचे 40 हून अधिक सैनिक शहीद झाले होते .पठाणकोटमधील दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा आरोपही मसूद अजहरवर होता . संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेला जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर आयएसआयने 2001 मध्ये संसदेवर केलेल्या हल्ल्याचा तसेच पुलवामा हत्याकांडासह भारतावर झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांचा मास्टरमाइंड आहे .

जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा संस्थापक मौलाना मसूद अझहर बहावलपूरमध्ये कडक सुरक्षा असलेल्या परिसरात उघडपणे राहत आहे. 2002 मध्ये जैश-ए-मोहम्मदला अधिकृतपणे बेकायदेशीर घोषित करण्यात आले असले तरी, ही बंदी कागदावरच आहे, कारण हा गट  दहशतवादाची प्रशिक्षण शिबिरे चालवतो.

1968 मध्ये बहावलपूर येथे जन्मलेला अझहर एकेकाळी अफगाणिस्तानातील हरकत-उल-मुजाहिदीन (HuM) चा सदस्य आणि धर्मगुरू होता. 1994 मध्ये दहशतवादाच्या आरोपाखाली भारतात अटक करण्यात आली होती, नंतर त्याला सोडण्यात आले आणि जानेवारी 2000 मध्ये कराचीमध्ये त्याने जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली. कट्टरपंथी देवबंदी विचारसरणीवर आधारित हा गट तेव्हापासून भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे. ज्यात जम्मू-काश्मीर विधानसभा आणि भारतीय संसदेवरील हल्ले यांचा समावेश आहे.

2019 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या अझहरला मूत्रपिंडाच्या समस्या असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे  तो सार्वजनिकरित्या कुठेही उपस्थित राहू शकत नाही. जून 2024 मध्ये तो शेवटचा एका लग्नात दिसला होता. त्याचा भाऊ अब्दुल रौफ अझहर आणि वरिष्ठ कार्यकर्ते शाह नवाज खान आणि मौलाना मुफ्ती मोहम्मद असगर हे पाकिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये 300 हून अधिक दहशतवादी भरतीसह प्रशिक्षण शिबिरांचे निरीक्षण करतात असे वृत्त आहे. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत मसूद अझहरच्या दहशतवादी अड्ड्यांवर क्षेपणास्त्र हल्ला केला असून यात बहावलपूरमधील त्याचा मदरसा आणि जैशचे मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. 

पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, 9 कॅम्प्स उद्धवस्त

(बहावलपूर (02), मुरीदके, मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबर, चक आमरू, सियालकोट येथे हवाई हल्ले करण्यात आले). या हवाई हल्ल्यात या ठिकाणी असलेले अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले.

1. बहावलपूर (2): जैश-ए-मोहम्मद मुख्यालय (जिथे 16 एप्रिल रोजी हमास कमांडरचे स्वागत करण्यात आले होते)

2. मुरीदके: लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय

3. मुझफ्फराबाद: हिजबुल मुजाहिद्दीनचा तळ

4. कोटली: दहशतवादी तळ

5. गुलपूर: दहशतवादाचे लाँच पॅड

6. भिंबर: दहशतवादाचे लाँच पॅड

7. चक अमरू: टेरर लाँच पॅड

8. सियालकोट: दहशतवादी तळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget