एक्स्प्लोर

Madan Lal Dhingra : शत्रूच्या भूमीवर जाऊन गोळ्या झाडणारा भारतमातेचा वीर, अवघ्या 26 व्या वर्षी फासावर चढले मदनलाल धिंग्रा

Madan Lal Dhingra Birth Anniversary : मदनलाल धिंग्रा यांनी इंग्लंडमध्ये त्यांच्याच भूमीवर जाऊन सर विल्यम हट कर्झन वायली या इंग्रज अधिकार्‍याचा समोरून गोळ्या घालून खून केला होता. या खूनानंतर अवघ्या एका महिन्यात मदनलाल यांना फाशीची शिक्षा सुनावली.

Madan Lal Dhingra Birth Anniversary : ज्या इंग्रजांनी आपल्या क्रूर आणि जुलमी राजवटीच्या जोरावर दीडशे वर्षे भारतावर राज्य केले. ते जुलमी राज्य उलथवून टाकण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले. तर अनेकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. त्यापैकीच एक म्हणजे वीर क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा. 

मदनलाल यांनी इंग्लंडमध्ये त्यांच्याच भूमीवर जाऊन सर विल्यम हट कर्झन वायली या इंग्रज अधिकार्‍याचा समोरून निधड्या छातीने पाच गोळ्या घालून खून केला. या खूनानंतर अवघ्या एका महिन्यात मदनलाल यांना फाशीची शिक्षा सुनावली. 18 फेब्रुवारी 1883 रोजी जन्मलेले मदनलाल 17 ऑगस्ट 1909 रोजी वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी भारत मातेसाठी फासावर लटकले. प्रत्यक्ष शत्रूच्या भूमीवर राहून, त्यांच्याच उच्चाधिकार्‍यास मारण्याचा पहिला मान मदनलाल धिंग्रा यांनी मिळवून इतिहासात आपले नाव सुवर्णक्षरांनी कोरून ठेवले.  

मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1883 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील दित्तमल धिंग्रा हे सुप्रसिद्ध सिव्हिल सर्जन होते. ते ब्रिटिश सत्तेचे विश्वासू म्हणून ओळखले जात. परंतु,मदनलाल हे ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या वृत्तीच्या विरोधात होते, त्यामुळे वडील मदनलाल यांच्यावर नाराज होते.  

मदनलाल यांचे प्राथमिक शिक्षण अमृतसर येथेच झाले. त्यानंतरचे शिक्षण त्यांनी अमृतसरमधील एमबी इंटरमिजिएट कॉलेजमध्ये घेतले आणि नंतर लाहोरमधील सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. परंतु, 1904 मध्ये विद्यार्थीदशेत असतानाच स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या क्रांतिकारकांबद्दल सहानुभूती असल्यामुळे त्यांना लाहोरमधील महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर कुटुंबाने मदनलाल यांच्यासोबतचे संबंध तोडले. त्यामुळे मदनलाल यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी काम करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. प्रथम त्यांनी लिपिक म्हणून काम केले. नंतर ब्रिटिश पर्यटक आणि शिमल्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी टांगा चालवण्याचे काम केले. त्यानंतर 1906 मध्ये त्यांच्या मोठ्या भावाच्या सल्ल्यानुसार मदनलाल उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. तेथे त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये यांत्रिक तंत्रज्ञानाचे शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि येथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटनी मिळाली.   

लंडनमध्ये शिकत असताना मदनलाल हे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांना भेटले. मदनलाल हे लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये राहत होते. इंडिया हाऊस हे भारतीय विद्यार्थ्यांच्या राजकीय चर्चांचे केंद्र होते. दरम्यानच्या काळात इंग्रजांनी खुदीराम बोस, कन्हैलाल दत्त, सतींदर पाल आणि काशीराम या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिल्याबद्दल आणि इंग्रजांनी भारतीयांवर केलेल्या अन्यायामुळे इंडिया हाऊसमधील सर्व भारतीय तरुण देशभक्त खूप संतापले होते. हे सर्व पाहून मदनलाल यांच्या मनात ब्रिटीश राजवटीविरुद्ध आधीच असलेली आग आणखीनच पेटली. त्याचवेळी त्यांनी बदला घेण्याचे ठरवले आणि कर्झन वायली याचा खून करण्याचे मनात पक्के केले. 

कर्जन वायली याचा खून करण्याची पूर्ण योजना आखून 1 जुलै 1909 रोजी मदनलाल धिंग्रा लंडनमधील 'द नॅशनल इंडियन असोसिएशन'च्या वार्षिक कार्यक्रमात सहभागी झाले. याच कार्यक्रमात कर्झन वायली देखील उपस्थित होता. कार्यक्रम संपल्यानंतर कर्झन वायली हॉलच्या बाहेर येत असताना मदनलाल यांनी अगदी जवळून त्याच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यातील चार गोळ्या कर्झन याच्या चेहऱ्यावर लागल्या आणि तो जागीच ठार झाला. या घटनेनंतर मदनलाल हे तेथून पळून गेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. मदनलाल यांना कोर्टात कर्झनच्या हत्येचे कारण विचारण्यात आले, त्यावेळी ते म्हणाले, भारताला अमानवी ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी मी माझी भूमिका बजावली आहे. कर्झन वायलीच्या हत्येप्रकरणी मदनलाल यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. 17 ऑगस्ट 1909 रोजी ब्रिटिश तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली.

या क्रांतिकारी घटनेने आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी कर्झन वायलीची हत्या केल्यामुळे मदनलालचे वडील खूप संतापले होते. मदनलाल यांना फाशी दिल्यानंतर लंडनमधून त्यांच्या अस्थी भारतात आणल्या नव्हत्या. काही काळानंतर शहीद मदनलाल यांच्या अस्थी लंडनहून 13 डिसेंबर 1976 रोजी भारतात आणण्यात आल्या. 20 डिसेंबर 1976 रोजी अमृतसर येथे तत्कालीन मुख्यमंत्री ग्यानी झैल सिंह यांच्या उपस्थितीत शहीद मदनलाल यांच्या अस्थिंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारत मातेसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या मदनलाल यांनी फासावर लटकवताना सांगितले की, 'माझ्या मातृभूमीसाठी मी माझे जीवन समर्पित करत आहे, याचा मला अभिमान आहे. भारत मातेचे रक्षण करण्यासाठी मला अनेक वेळा भारतीय म्हणून जन्म घ्यायचा आहे. अशा महान क्रांतिकारी शहीद मदनलाल धिंग्रा यांची आज जयंती. जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
Suresh Dhas & Satish Bhosale : सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
Babita Tade : KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 07 March 2025Rohit Sharma School Update | रोहित शर्माच्या शाळेतील तोडलेलं क्रिकेट टर्फ पुन्हा बांधून देणार, म्हाडाकडून हमी सुपूर्दNitesh Rane | हे कसली तक्रार करतात, यांनी लोकांचे छळ केले; अनिल परब VS नितेश राणे यांच्यात खडाजंगीAmbadas Danve | तर मी दिलगिरी व्यक्त करतो, परबांच्या व्यक्तव्याचा अनर्थ होतोय, दानवेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
Suresh Dhas & Satish Bhosale : सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
Babita Tade : KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
माझा इम्पॅक्ट : रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी जिथं क्रिकेटर्स घडवले, तिथल्या तोडकाम केलेल्या टर्फला म्हाडाची एनओसी
माझा इम्पॅक्ट : रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी जिथं क्रिकेटर्स घडवले, तिथल्या तोडकाम केलेल्या टर्फला म्हाडाची एनओसी
Embed widget