एक्स्प्लोर

भारतीय रेल्वेची स्थिती म्हणजे ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’

भारतीय रेल्वेच्या वित्तीय विभागाच्या आकडेवारीनुसार, 100 रुपये कमवण्यासाठी भारतीय रेल्वेला 111.51 रुपये खर्च करावे लागतात.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची आर्थिक स्थिती चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जुलै महिन्यात ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’ अशी झाली आहे. कारण प्रवासभाडं किंवा मालभाड्यातून रेल्वे जेवढे पैसे कमवते, त्यापेक्षा जास्त खर्च करत आहे. भारतीय रेल्वेच्या वित्तीय विभागाच्या आकडेवारीनुसार, 100 रुपये कमवण्यासाठी रेल्वेला 111.51 रुपये खर्च करावे लागतात. एप्रिल ते जुलैमधील रेल्वेचं ऑपरेटिंग रेशो 111 टक्के आहे. यावरुन स्पष्ट झालेय की, भारतीय रेल्वेचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेचं ऑपरेटिंग रेशो कायम वर राहिले आहे, मात्र गेल्या 5-6 वर्षांपासून ऑपरेटिंग रेशो 90 टक्क्यांच्या आवती-भोवती फिरताना दिसत आहे. म्हणजे 100 रुपये कमवण्यासाठी 90 रुपये खर्च करावे लागत. आता 2017-2018 या वर्षात भारतीय रेल्वेने ऑपरेटिंग रेशोचं लक्ष्य 92.8 टक्के ठेवलं होतं, मात्र प्रत्यक्षात 96 टक्के होतं. ऑपरेटिंग रेशो म्हणजे काय? उत्पन्न आणि खर्च यांची तुलना म्हणजे ऑपरेटिंग रेशो. ऑपरेशनल खर्चाला ऑपरेशनल महसुलातून वजा केले जाते, जेणेकरुन उर्वरीत आकड्यांवरुन रेल्वेची आर्थिक प्रगत अधोरेखित करते. ऑपरेटिंग रेशो जास्त असण्याचा अर्थ असा की, जितकी गुंतवणूक केली गेलीय, तेवढा परतावा मिळाला नाही. आणि जास्त ऑपरेटिंग रेशो असल्यास, त्याचा परिणाम नवे मार्ग उभारणे, नवीन कोच बनवणे किंवा रेल्वेचं आधुनिकीकरण यांसारख्या कामांवर होतो. कमाईचं लक्ष्य अपूर्णच! रेल्वेने प्रवाशी तिकिटांमधून एप्रिल ते जुलै या दरम्यान 17,273.37 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र या महिन्यांमध्ये 17,736.09 कोटींचं लक्ष्य होतं. ते पार करता आले नाही. मालभाड्याबाबतही अशीच स्थिती आहे. एप्रिल-जुलै दरम्यान रेल्वेने मालभाड्याचं लक्ष्य 39,253.41 कोटी रुपये होतं, मात्र प्रत्यक्षात 36,480.41 कोटी रुपये कमाई झाली. रेल्वेच्या वित्तीय विभागाने ही आकडेवारी गोळा केलीय. रेल्वेची एकूण कमाई किती? चालू आर्थिक वर्षात रेल्वेची एकूण कमाई 56,717.84 कोटी रुपये आहे. मात्र रेल्वेने एकूण कमाईचं लक्ष्य 61,902.51 कोटी रुपये ठेवले होते. रेल्वे चालवण्यासाठी किती खर्च येतो? एप्रिल ते जुलै दरम्यान रेल्वे चालवण्याचा खर्चा 52,517.71 कोटी रुपये इतका आला आणि याच काळात 50,487.36 कोटी रुपये रेल्वेची एकूण कमाई झाली. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रेल्वे चालवण्याच्या खर्चासोबतच इतर खर्च असतात, ज्यामुळे ऑपरेटिंग रेशोमध्ये वाढ होते. पेन्शन किंवा इतर गोष्टींवरील खर्च पेन्शन, रेल्वे बोर्डाचा खर्च आणि रेल्वेच्या इतर संस्थांवरील खर्च, हा सारा खर्चही रेल्वे चालवण्याच्या खर्चाशिवाय आहे. त्यामुळे रेल्वेच्या ऑपरेटिंग रेशोवर याचा परिणाम होतो. आणि त्यामुळेच ऑपरेटिंग रेशो 11.51 वर पोहोचलं आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 47 हजा कोटी रुपये रेल्वेकडून पेन्शन दिले जाते. याचाच अर्थ एप्रिल ते जुलै दरम्यान रेल्वेने जवळपास 12 हजार कोटी रुपये केवळ पेन्शवर खर्च केले. दरम्यान, रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वेची कमाई सीझनवर अवलंबून असते. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीतही ही तूट भरुन निघू शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget