एक्स्प्लोर

रेल्वे प्रवास अजून सुखावणार, भारतीय रेल्वेची 'विस्टाडोम कोच' ट्रेन सुरु

विशाखापट्टणम : भारतीय तथा परदेशी पाहुण्यासाठी रेल्वेचा प्रवास अजून सुखावणारा ठरणार आहे. कारण, भारतीय रेल्वेनं पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नव्आ विस्टाडोम कोचचा अंतर्भाव असलेली ट्रेन सुरु केली आहे. रविवारी ही नवी ट्रेन आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम ते  छत्तीसगडच्या किरंदुलदरम्यान धावली. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी भुवनेश्वरमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या नव्या ट्रेनचं लोकार्पण केलं. विस्टाडोम कोचची ट्रेन ही पूर्णपणे वातानुकुलित आहे. फोटो सौजन्य : भारतीय रेल्वे फोटो सौजन्य : भारतीय रेल्वे विस्टाडोम ट्रेन काय आहे? या नव्या ट्रेनसाठी रेल्वे मंत्रालयाने 3.38 कोटी रुपये खर्च केले असून, या ट्रेनमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. विशेष म्हणजे, या ट्रेनच्या दोन्ही बाजूंसोबत छतालाही काचा बसवण्यात आल्या आहेत. यातून रेल्वे प्रवाशांना आसपासचं निसर्ग सौंदर्य पाहता येतं. या ट्रेनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या ट्रेनमधील सीट 360 अंशात फिरवता येते. शिवाय याला स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत. या ट्रेननं विशाखापट्टणम ते अराकुघाटी पर्वत स्टेशनपर्यंत 128 किलोमीटर प्रवास करताना निसर्गाचं अद्भुत सौंदर्य प्रवाशांना पाहता येईल. देशातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी रेल्वेनं ही नवी सेवा सुरु केली असल्याचं यावेळी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं. vistadom सर्वप्रकारच्या यात्रेकरुंसाठी विशेष ट्रेन या नव्या सेवेतून आपलं उत्पन्न वाढवण्याचाही रेल्वेचा मानस आहे. यासाठी रेल्वेने नवनव्या योजना सुरु करणार आहे. त्यानुसार परदेशी पर्यटकांसाठी लक्झरी पर्यटक ट्रोन (LTT) चालवण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये परदेशी पाहुण्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असतील.  तर देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी सेमि लक्झरी टूरिस्ट ट्रेन (SLTT) ही चालवण्यात येणार आहे. भारत दर्शनासाठी BTD ही ट्रेन सेवाही सुरु करण्यात येणार आहे. यातील सर्व कोच स्लीपर असतील. या ट्रेनचा तिकीट दर सर्वसामान्य मेल एक्सप्रमाणेच असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंसाठीही विशेष सुरु करण्यात येणार असून, आस्था सर्किट ट्रेन (ACT) ही महत्त्वाच्या धार्मिक स्थळांसाठीच असणार आहे. तर बुद्ध स्पेशल ट्रेन (BCT)  ही देखील एक विशेष ट्रेन सुरु करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Embed widget