Indian Navy Day 2022 : आज 'भारतीय नौदल दिन'; या निमित्ताने जाणून घ्या नौदल दिनाचा इतिहास आणि महत्त्व
Indian Navy Day 2022 : भारतीय नौदलाची स्थापना 1612 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केली होती.
Indian Navy Day 2022 : 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध जिंकलेल्या भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणि शौर्य लक्षात ठेवण्यासाठी दरवर्षी 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन (Indian Navy Day 2022) साजरा केला जातो .
4 डिसेंबर 1971 रोजी 'ऑपरेशन ट्रायडंट' अंतर्गत भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची नौदल तळावर हल्ला केला. या ऑपरेशनचे यश लक्षात घेऊन दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. जंग-ए-आझादी, मुंबईतील ऑपरेशन ताजपासून ते इतर अनेक घटनांपर्यंत भारतीय नौदलाचा इतिहास कर्तृत्वाने भरलेला आहे.
नौदल ही भारतीय लष्कराची सागरी शाखा आहे, जी 1612 मध्ये स्थापन झाली. ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनी मरीन म्हणून एक सैन्य उभे केले, ज्याचे नंतर रॉयल इंडियन नेव्ही असे नामकरण करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, 1950 मध्ये नौदलाची पुनर्रचना करण्यात आली आणि तिचे भारतीय नौदल असे करण्यात आले.
या दिवशी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जातात आणि दरवर्षी नौदल दिन साजरा करण्यासाठी वेगळी थीम ठरवली जाते. नौदल दिन त्याचा इतिहास आणि त्याचे महत्त्व याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
भारतीय नौदल दिनाचा इतिहास
जगातील पाचव्या क्रमांकाच्या या नौदलाने 1971 च्या बांगलादेश मुक्ती युद्धात पाकिस्तानच्या कराची बंदरावर जोरदार बॉम्बफेक करून उद्ध्वस्त केले. 4 डिसेंबर 1971 रोजी ऑपरेशन ट्रायडंट नावाने सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत मिळालेल्या यशामुळे दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. 1945 पासून दुस-या महायुद्धानंतर 1 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जात होता, मात्र नंतर तो 15 डिसेंबर 1972 पर्यंत साजरा करण्यात आला, त्यानंतर 1972 पासून फक्त 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जात आहे. नौदल दिनाच्या दिवशी भारत-पाकिस्तान युद्धात मारले गेलेल्यांचे स्मरण केले जाते आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलांची नौदल शाखा आहे ज्याचे नेतृत्व भारताचे राष्ट्रपती कमांडर-इन-चीफ म्हणून करतात. मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते.
भारतीय नौदल दिनाचे महत्त्व
भारतीय नौदलाची स्थापना 1612 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केली होती. नंतर त्याला रॉयल इंडिया नेव्ही असे नाव देण्यात आले आणि स्वातंत्र्यानंतर 1950 मध्ये भारतीय नौदल म्हणून त्याची पुनर्रचना करण्यात आली. पाकिस्तानविरुद्धच्या विनाशकारी युद्धानंतर संपूर्ण देशाने भारतीय नौदलाच्या यशाचा जल्लोष साजरा केला.
भारतीय नौदलाची सुरुवात ईस्ट इंडियाच्या काळात झाल्याचं मानण्यात येतं. ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी नौदलाची एक टीम तयार केली. नंतर याचं नामकरण रॉयल इंडियन नेव्ही असं करण्यात आलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1950 साली रॉयल इंडियन नेव्ही हे नाव बदलण्यात आलं आणि भारतीय नौदल अर्थाच इंडियन नेव्ही असं ठेवण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या :