Monsoon Alert : 31 मेनंतर मान्सून केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता; देशात अनुकूल परिस्थिती : आयएमडी
Monsoon Alert : देशात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असून 31 मेनंतर मान्सून केरळच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.
![Monsoon Alert : 31 मेनंतर मान्सून केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता; देशात अनुकूल परिस्थिती : आयएमडी indian meteorological department expresses possibility of southwest monsoon to reach kerala on may 31 Monsoon Alert : 31 मेनंतर मान्सून केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता; देशात अनुकूल परिस्थिती : आयएमडी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/b20db8162a985e1a20f871f63180bf0d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून 31 मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. जर हवामान विभागानं वर्तवलेला हा अंदाज खरा ठरला तर देशात दक्षिणी राज्यांमध्ये मान्सून वेळेआधीच दाखल होणार आहे. गुरुवारी मॉन्सून मालदीव-कोमोरिन भागातील काही भागांत पुढे सरकला असून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्व आणि पूर्व-मध्य प्रदेशांवर पोहोचला आहे.
केरळच्या काही भागांत पावसाळ्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच केरळमधील बर्याच भागांत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहेत. एर्नाकुलम, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, पठानमथिट्टा आणि जिल्ह्यांमध्ये 24 तासांसाठी पावसाची नोंद करण्यात आली असून तिरुअनंतपुरममध्ये 19 मिमी ते 115 मिमी दरम्यान पावसाची नोंद करण्यात आली आहे.
आयएमडीने केरळमध्ये मान्सून धडकण्याची घोषणा तेव्हाच करतं जेव्हा 10 मे नंतर कोणत्याही वेळी सलग दोन दिवस निर्धारित 14 हवामान विभागांवरून 2.5 मिमी किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता असल्याच्या सूचना देण्यात येतात. तसेच मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे इतर घटक म्हणजे वारा आणि आउटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशनचं मूल्य. या सर्व घटकांचं मूल्यमापनही केलं जातं.
भारतीय हवामान विभागानं केरळमध्ये मान्सून 10 मेनंतर कोणत्याही वेळी सलग दोन दिवसांसाठी 14 हवामान विभागांवरून 2.5 मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची पावसाची शक्यता असल्याच्या सूचना मिळाल्या आहेत. अशातच 31 मे रोजी हवामान विभाग आगामी हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जाहीर करण्यास तयार आहे.
भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी गुरुवारी मार्च ते मे या कालावधीत देशभरात 15 टक्के पाऊस झाला. ईशान्य राज्ये, जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात सध्याच्या मान्सूनपूर्व हंगामात सामान्य किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)