Indian Government: चारचाकी डिझेल SUV खरेदी करण्याचा विचार करताय? त्याआधी पेट्रोलियम मंत्रालयाच्या समितीच्या शिफारसी जाणून घ्या...
डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांवर बंदी घालावी, असा प्रस्ताव भारत सरकारच्या पॅनेलने सादर केला आहे. 2027 पर्यंत डिझेलवर चालणारी चारचाकी वाहनं पूर्णपणे बंद व्हावी, असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
![Indian Government: चारचाकी डिझेल SUV खरेदी करण्याचा विचार करताय? त्याआधी पेट्रोलियम मंत्रालयाच्या समितीच्या शिफारसी जाणून घ्या... indian government panel proposes ban on diesel 4 wheeler vehicles by 2027 Indian Government: चारचाकी डिझेल SUV खरेदी करण्याचा विचार करताय? त्याआधी पेट्रोलियम मंत्रालयाच्या समितीच्या शिफारसी जाणून घ्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/27/a997a158d426b8498a368bc4d7ad0c891679915098569551_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
New Delhi: भारताने 2027 पर्यंत डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे आणि उत्सर्जन (emission) कमी करण्यासाठी दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये, तसेच प्रदूषित शहरांमध्ये इलेक्ट्रिक (Electric Vehicle) आणि गॅस-इंधन (Gas-fuelled) असलेली वाहनं वापरली पाहिजे, अशी शिफारस केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका पॅनेलने केली आहे.
भारत हा ग्रीनहाऊस गॅसचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन करणारा देश आहे. भारतात कार्बन-डायऑक्साईड आणि मिथेन सारख्या वायूंचे प्रमाण मागच्या 10-15 वर्षांच्या तुलनेत 40 टक्क्यांनी वाढले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास हा घटक कारणीभूत ठरतो. त्यामुळे वायु प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक (EV) आणि सीएनजी (CNG) गाड्यांचा वापर करण्यावर भर द्यावा, असे भारत सरकारच्या पॅनलने सूचवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)