एक्स्प्लोर
Advertisement
भारतीय जवानांकडून काश्मीरमध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानचा घुसखोरीचा डाव हाणून पाडला
अमरनाथ यात्रेच्या मार्गादरम्यान काल (02 ऑगस्ट) पाकिस्तानी लष्कराची स्नायपर सापडल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंर भारतीय लष्कराने आज सीमेवर सर्च ऑपरेशन राबवले.
श्रीनगर : अमरनाथ यात्रेच्या मार्गादरम्यान काल (02 ऑगस्ट) पाकिस्तानी लष्कराची स्नायपर सापडल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंर भारतीय लष्कराने आज सीमेवर सर्च ऑपरेशन राबवले. या ऑपरेशनदरम्यान भारतीय जवानांनी सीमेवर 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
जम्मू काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने धडक कारवाई करत पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा घुसखोरीचा डाव हाणून पाडला आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार 7 दहशतवादी ठार झाले आहेत. परंतु या कारवाईत आणखी दहशतवादी ठार झाले असल्याची शक्यता आहे.
गेल्या 36 तासांपासून भारतीय लष्कर आणि घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी सैनिकांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
केरन सेक्टरमध्ये जोरदार चकमकी सुरु असल्यामुळे लष्कराला दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेता आले नाहीत, तसेच त्या मृतदेहांची ओळख पटवता आली नाही. त्यामुळे लष्कराने उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. दरम्यान हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानचे सैनिक प्रयत्न करत आहेत.
In the last 36 hours, Indian Army has foiled an infiltration attempt by a Pakistani BAT (Border Action Team) squad in Keran Sector. 5-7 Pakistani army regulars/terrorists eliminated, their bodies are lying on the LoC, not retrieved yet due to heavy firing. (Source: Indian Army) pic.twitter.com/gBa89BuQ0M
— ANI (@ANI) August 3, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
भारत
Advertisement