एक्स्प्लोर

Right To Vote : मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Supreme Court On Voting Right : मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचे अधिकार हे पूर्णपणे वेगवेगळे असून त्यांना समान मानणं चुकीचं आहे, ते एकमेकांपासून भिन्न आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

नवी दिल्ली : मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही, तर तो कायद्याने दिलेला अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. राजस्थानमधील जिल्हा दुग्ध संघाच्या निवडणुकीशी संबंधित प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयानं स्पष्ट केलं की, मतदान आणि निवडणूक लढवण्याचे अधिकार हे पूर्णपणे वेगवेगळे असून त्यांना समान मानणं चुकीचं आहे. या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत सुरू असलेल्या चर्चांना नवं वळण मिळालं आहे.

Supreme Court Observation : मतदान आणि निवडणूक लढवणं वेगळं

सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की, मतदानाचा अधिकार नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देतो. मात्र निवडणूक लढवण्याचा अधिकार हा अतिरिक्त असून त्यावर विविध अटी आणि पात्रता लागू करता येतात. त्यामुळे दोन्ही अधिकार एकसारखे नाहीत, हे स्पष्ट करण्यात आलं.

Legal Status of Rights : कायद्याने मिळणारे अधिकार

न्यायालयानं यापूर्वीच्या ‘ज्योती बसू विरुद्ध देवी घोषाल (1982)’ आणि ‘जावेद विरुद्ध हरियाणा राज्य (2003)’ या निर्णयांचा दाखला देत हे अधिकार केवळ कायद्याने दिलेले असल्याचं सांगितलं. संविधानातील मूलभूत अधिकारांमध्ये त्यांचा समावेश होत नाही, असंही स्पष्ट केलं.

High Court Error : हायकोर्टची चूक ठरली

या प्रकरणात राजस्थान हायकोर्टानं मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार एकसारखा मानला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं हा दृष्टिकोन चुकीचा ठरवत संबंधित नियम हे फक्त निवडणूक लढवण्याच्या पात्रतेशी संबंधित असल्याचं सांगितलं. तसंच सर्व संबंधित पक्षांना न ऐकता निर्णय देणं हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांच्या विरोधात असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं.

Final Verdict : हायकोर्टाचा निर्णय रद्द

सर्वोच्च न्यायालयानं राजस्थान हायकोर्टाचा निर्णय रद्द करत अपील मंजूर केलं. तसेच सहकारी संस्थांना त्यांच्या नियमांनुसार निवडणूक प्रक्रिया आणि पात्रता ठरवण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट केलं.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

E20 Fuel : पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिसळणार का? इंजिनचे नुकसान, मायलेजवरुन संसदेत मोठं स्पष्टीकरण!
पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिसळणार का? इंजिनचे नुकसान, मायलेजवरुन संसदेत मोठं स्पष्टीकरण!
पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल! जगातील सर्वात स्वस्त इंधन असलेले देश कोणते? अव्वल स्थानी कोण?
पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल! जगातील सर्वात स्वस्त इंधन असलेले देश कोणते? अव्वल स्थानी कोण?
Sonam Wangchuk : मी उपोषण सुरु ठेवतोय, आंदोलकांवरील लाठीचार्जमुळं सोनम वांगचुक यांचा 23 व्या दिवशी उपोषण सुरु ठेवण्याचा मेसेज 
23 व्या दिवशी उपोषण सुरुच ठेवणार, आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानं सोनम वांगचुक यांचा निर्धार 
Rahul Gandhi : प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना तुडवलं जातंय, लाठीचार्ज केला जातोय; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात!
प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना तुडवलं जातंय, लाठीचार्ज केला जातोय; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात!

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget