एक्स्प्लोर

Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार

Nashik Crime News : नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून होण्याची शक्यता आहे. 

नाशिक : लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील नामांकित कंपनीला टाळं लागणार आहे. कंपनीमधील कर्मचाऱ्यांना आता मुबंई, पुण्यातील इतर प्रोजेक्टमध्ये शिफ्ट केलं जाणार असल्याची माहिती आहे. नाशिकमधील धर्मांतर प्रकरण उघडकीस आल्यानंतर कर्मचाऱ्यांना नाशिक युनिटमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना एकतर मुंबई-पुण्याला स्थलांतरित व्हावं लागणार आहे किंवा नवीन नोकरी शोधावी लागणार आहे. 

नाशिकमधील एका कंपनीमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर देशभर खळबळ उडाल्याचं चित्र आहे. त्यामुळे या कंपनीने आता नाशिकमधील त्यांचं युनिटच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांवर एकतर मुबंई-पुण्यात स्थलांतरित होण्याची किंवा बेरोजगारी टाळण्यासाठी नविन नोकरी शोधण्याची वेळ आली आहे.

सध्या या कंपनीमध्ये पोलीस तपासाच्या कारणास्तव मोजकेच कर्मचारी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे. कागदपत्रची तपासणी तसेच इतर माध्यमातून पोलिसाची चौकशी सुरू आहे. कंपनीच्या आवारात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

मोठं रॅकेट असल्याचा संशय

नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून होण्याची शक्यता आहे. एनआयए, एटीएस आणि सीबीआय या प्रकरणाचा तपास करण्याची शक्यता आहे. SIT कडून प्रकरणाची महत्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली आहे.  लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे. 

लैंगिक शोषण प्रकरणातील तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरूख कुरेशी, शफी शेख, आसीफ शेख हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. तरुणीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारी कंपनीतील महिला अधिकारी अश्विनी चेनानी पोलीस कोठडीत आहे. तर आरोपींच्या गुन्ह्यात सहभागी असणारी निदा खान अद्यापही फरार आहे. पोलीस तिचा शोध घेण्यात अजून तरी अपयशी ठरलेत. 

तरुणींचे ब्रेशवॉश

नाशिकच्या एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत उघडकीस आलेले लैंगिक शोषण आणि धर्मांतराचे प्रकरण आता अधिक गडद होत चालले आहे. केवळ लैंगिक शोषणच नाही, तर तरुणींचे पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करून त्यांचे धर्मांतर करण्याचा मोठा 'मास्टरगेम' कंपनीत सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. 

तपासादरम्यान पीडित तरुणीच्या बाबतीत काही अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पीडितेने सलग दोन वर्षे महिना-महिनाभर उपवास पकडण्यास सुरुवात केली होती. हिंदू मैत्रिणींनी तिला जेवणासाठी बोलावले तरी ती स्पष्ट नकार देत असे. धक्कादायक म्हणजे, पीडितेने गेल्या वर्षापासून 'लिप्स्टिक' लावणेही पूर्णपणे बंद केले होते. संशयित दानिश हा विवाहित असल्याचे पीडितेला तिच्या टीम लीडरने अनेकदा सांगितले, तिची समजूत काढली. मात्र, संशयितांच्या जाळ्यात अडकलेल्या पीडितेला यावर विश्वासच बसत नव्हता.

ही बातमी वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
Ashok Kharat Case: अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
' ती क्लिप एआयने बनवलेली' वाल्मिक कराडचा कथित कॉल गेलेल्या सुग्रीव कराडची पहिली प्रतिक्रिया; बजरंग सोनवणेंच्या आरोपावर काय म्हणाला?
' ती क्लिप एआयने बनवलेली' वाल्मिक कराडचा कथित कॉल गेलेल्या सुग्रीव कराडची पहिली प्रतिक्रिया; बजरंग सोनवणेंच्या आरोपावर काय म्हणाला?
Pune University FDA Crime : जेवणात जिवंत झुरळ, किचन अस्वच्छ अन्....; ‘एफडीए’ची पुणे विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये एफडीएची धडक कारवाई, मेस केली बंद
जेवणात जिवंत झुरळ, किचन अस्वच्छ अन्....; ‘एफडीए’ची पुणे विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये एफडीएची धडक कारवाई, मेस केली बंद

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
Embed widget