एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: भारताचे आणखी एक मोठे पाऊल, पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय एअरस्पेस बंद; पाकिस्तानचा तो निर्णय त्यांच्यावरच उलटवला, होणार कोट्यवधींचं नुकसान, कारण काय?

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून होणाऱ्या संभाव्य लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. 23 मे पर्यंत हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे.

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असून, दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने आता पाकिस्तानच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद करत ठोस प्रत्युत्तर दिले आहे. भारत सरकारकडून पाकिस्तानच्या विरोधात काही मोठे निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये सिंधू जल करार रद्द करण्यासह अटारी बॉर्डर तत्काळ बंद करण्यात आली, पाकिस्तानी नागरिकांना मिळणारा सार्क व्हिसा रद्द करण्यात आला, पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील लष्करी, नौदल व हवाई सल्लागारांना ‘पर्सना नॉन ग्राटा’ घोषित करण्यात आले आणि उच्चायुक्तालयात काम करणाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पाकने देखील भारताच्या विरोधात काही निर्णय घेतले. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेशास मनाई केली. पाकिस्तानने भारतातील विमान वाहतूक क्षेत्राला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. त्यानंतर आता भारतानेही पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं आहे. 

पहलगाम हल्ल्यानंतर संभाव्य लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं आहे. 30 एप्रिल ते 23 मे पर्यंत हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. या काळात, पाकिस्तानच्या नोंदणीकृत, चालवल्या जाणाऱ्या किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांसह पाकिस्तानी लष्करी विमानांना या क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर त्यांच्या विमान कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. पूर्वी पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्द वापरून चीन, म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि श्रीलंकेत उड्डाण करत होता, परंतु आता हवाई हद्द बंद झाल्यानंतर, त्यांच्या विमानांना पुन्हा या देशांमध्ये पोहोचण्यासाठी जास्त अंतराचा प्रवास करावा लागेल.

पाकिस्तानी एअरलाइन्स पीआयएने उड्डाणे केली रद्द 

भारतीय हवाई क्षेत्र बंद करण्यापूर्वी, पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिले होते की, पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी पीआयएने गिलगिट, स्कार्दू आणि पाकव्याप्त काश्मीरला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. उर्दू दैनिक 'जंग' ने दिलेल्या वृत्तानुसार, पीआयएने कराची आणि लाहोरहून स्कार्दूला जाणारी प्रत्येकी दोन उड्डाणे रद्द केली आहेत. इस्लामाबादहून स्कार्दू आणि गिलगिटला जाणाऱ्या एकूण सहा विमान उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राची देखरेखही कडक केली आहे.

एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार, सुरक्षेच्या कारणास्तव सर्व व्यावसायिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, ही सर्व पावले खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रादेशिक तणावादरम्यान राष्ट्रीय हवाई सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उचलण्यात आली आहेत. याशिवाय, पाकिस्तान प्राधिकरणाने सर्व विमानतळांना हाय अलर्टवर ठेवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget