एक्स्प्लोर

Coronavirus Updates : देशात गेल्या 24 तासात 33 हजार रुग्णांची भर, 25 हजार रुग्ण एकट्या केरळमधून

Coronavirus Updates : गेल्या 24 तासात सर्वाधिक रुग्णसंख्येची वाढ ही केरळमध्ये झाली आहे. काल एकाच दिवसात केरळमध्ये 25 हजार 10 नवीन रुग्णांची भर पडली तर 177 लोकांचा मृत्यू झाला आहे.  

नवी दिल्ली : देशात एकीकडे लसीकरणाच्या कार्यक्रमाने 73 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी दुसरीकडे कोरोनाची रुग्णसंख्या काही केल्या कमी येत नसल्याचं दिसून येतंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 33 हजार 376 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 308 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात एकूण 32 हजार 198 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधीचा विचार करता गुरुवारी देशात 34 हजार 976 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 260 जणांचा मृत्यू झाला होता.

केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासात वाढलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद ही केरळमध्ये झाली आहे. काल एकाच दिवसात केरळमध्ये 25 हजार 10 नवीन रुग्णांची भर पडली तर 177 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Corona Update : राज्यात आज  4,154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात  

देशातील कोरोनाची सद्यस्थिती : 

  • कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 32 लाख 08 हजार 330
  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 23 लाख 74 हजार 497
  • सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 91 हजार 516
  • एकूण मृत्यू : चार लाख 42 हजार 317
  • एकूण लसीकरण : 73 कोटी 05 लाख 89 हजार 688 लसीचे डोस 

Coronavirus : पूर्ण लसीकरण झालेला व्यक्तीच्या मृत्यूची शक्यता 11 पटींनी कमी; अमेरिकेच्या CDC चा अहवाल

राज्यात पुण्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णसंख्या
राज्यात शुक्रवारी 4,154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 524  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 91 हजार 179  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 05 टक्के आहे. गुरुवारी 44 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्याचा एकूण मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाला आहे.

भारतात 73 कोटी लोकांचे लसीकरण
भारतातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने चांगलाच वेग घेतला असून 73 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी संध्याकाळी याबाबतची आकडेवारी जारी केली. त्यामध्ये सांगिलं आहे की, देशातील 55.58 कोटी नागरिकांना लसीचा पहिला डोस आणि 17.38 कोटी नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. देशातील 18 टक्के नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. 

Corona Vaccination : हिमाचल पाठोपाठ गोव्यातही 100 टक्के लसीकरण, देशात 73 कोटी डोस वितरित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटकाPune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
Embed widget