HUMAN DEVELOPMENT REPORT : मानव विकास निर्देशांकामध्ये भारताची घसरण, स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर
HUMAN DEVELOPMENT REPORT 2021 - 22 : मानव विकास निर्देशांकामध्ये पुन्हा एकदा भारताच्या स्थानामध्ये एकदा घसरण झाली आहे.
HUMAN DEVELOPMENT REPORT 2021 - 22 : मानव विकास निर्देशांकामध्ये पुन्हा एकदा भारताच्या स्थानामध्ये एकदा घसरण झाली आहे. 191 देशांमध्ये भारताचा क्रमांक 132 वा आहे. गेल्यावर्षी मानव विकास निर्देशांकामध्ये (HUMAN DEVELOPMENT REPORT) भारत 130 व्या क्रमांकावर होता. यंदा भारताच्या क्रमवारीत दोन अंकांनी घसरण झाली आहे. संयुक्त राष्ट विकास कार्यक्रमाच्या ( United Nations Development Programme’s (UNDP) HDI ranking) अहवालानुसार, मानव विकास निर्देशांकामध्ये भारताची दोन गुणांनी घसरण झाली आहे. यामध्ये स्वित्झर्लंड (Switzerland ) पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी स्वित्झर्लंड तिसऱ्या क्रमांकावर होतं. देशातील आरोग्य, शिक्षण आणि लोकांच्या जीवनमानाचे मोजमाप करण्यासाठी मानव विकास निर्देशांकाचा वापर केला जातो. प्रत्येकवर्षीय यूएनडीपीकडून मानव विकास निर्देशांक जाहीर करण्यात येतो. दरम्यान, मागील वर्षी भारतीयांचे जीवनमान हे 69.7 वर्षे एवढे होते. ते आता घसरुन 67.2 इतके झाले आहे.
भारत मध्यम मानवी विकास क्रमवारीमध्ये मोडला जातो. तर स्वित्झर्लंड अतिउच्च मानवी विकास क्रमवारीमध्ये मोडला जातो. विशेष म्हणजे, आपल्या शेजारी असलेला श्रीलंका उच्च मानवी विकास क्रमवारीमध्ये मोडला जातो. मानव विकास निर्देशांकामध्ये श्रीलंका 73 व्या क्रमांकावर पोहचलाय. गेल्यावर्षी श्रीलंका 75 व्या क्रमांकावर होता.
भारताच्या शेजारी पाकिस्तान Low Human Development Category मध्ये मोडला जातो. पाकिस्तान मानव विकास निर्देशांकामध्ये 161 व्या क्रमांकावर आहे. तर 191 व्या क्रमांकावर दक्षिण सुदान हा देशाचा क्रमांक लागतो. भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळ आणि बांगलादेश यांचाही क्रमांक पाहूयात. मानव विकास निर्देशांकामध्ये बांगलादेश 129 व्या क्रमांकावर आहे, गेल्यावर्षी बांगलादेश 128 व्या क्रमांकावर होता. तर नेपाळनं एका स्थानाने प्रगती केली आहे. नेपाळनं 144 वुन 143 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मानव विकास निर्देशांकामध्ये चीन 79 व्या क्रमांकावर आहे. तर भुटान 127 व्या क्रमांकावर आहे.
India ranks 132 out of 191 countries in 2021 human development index, according to report released by United Nations Development Programme
— Press Trust of India (@PTI_News) September 8, 2022
आणखी वाचा :