एक्स्प्लोर

Kartvyapath Inauguration : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'कर्तव्य पथ'चे उद्घाटन, म्हणाले, आज देशासाठी ऐतिहासिक दिवस

Kartvyapath Inauguration : पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते आज सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात  आलं. यावेळी राजपथचं नाव बदलून कर्तव्यपथ करण्यात आलं.

Kartvyapath Inauguration : पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात  आलं. यावेळी राजपथचं नाव बदलून कर्तव्यपथ करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी या क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य लाभल्याच्या भावना व्यक्त केल्या. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्यामुळे आता  तो 'कर्तव्य पथ' म्हणून ओळखला जाईल. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरणही केले.  "नेताजी सुभाषचंद्रबोस यांनी 1947 च्या आधी आंदमानवर तिरंगा फडकवला होता आणि लाल किल्यावर तिरंगा फडकवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. नेताजींच्या पुतळ्यामुळे देशाला प्रेरणा मिळेल. आम्ही आता गुलामीची ओळख मिटवली आहे, अशा भावना यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या. 

पंतप्रधान म्हणाले, गुलामगिरीचे प्रतीक असलेला किंग्सवे म्हणजेच राजपथ आजपासून इतिहासाचा विषय बनला आहे. तो कायमचा पुसला गेला आहे. वसाहतवादाच्या आणखी एका प्रतीकातून बाहेर पडल्याबद्दल मी देशातील सर्व जनतेचे अभिनंदन करतो. हा भारताच्या लोकशाही भूतकाळाचा जिवंत मार्ग आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेल्या सर्व देशवासियांचे मी मनापासून स्वागत करतो. 

"गेल्या आठ वर्षात आम्ही असे अनेक निर्णय घेतले ज्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची छाप होती. अंदमान आणि निकोबार बेटांवर राष्ट्रध्वज फडकवणारे ते 'अखंड भारत'चे पहिले प्रमुख होते. आज इंडिया गेटजवळ आपले राष्ट्रीय महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही मोठा पुतळा बसवण्यात आला आहे. गुलामगिरीच्या वेळी ब्रिटीश राजवटीच्या प्रतिनिधीचा पुतळा होता. आज त्याच ठिकाणी नेताजींच्या पुतळ्याची स्थापना करून देशाने आधुनिक, सशक्त भारताचे जीवनही प्रस्थापित केले आहे, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

पंतप्रधान म्हणाले, "आज देशाने ब्रिटिश काळापासून चालत आलेले शेकडो कायदे बदलले आहेत. इतकी दशके ब्रिटीश संसदेची वेळ पाळणाऱ्या भारतीय अर्थसंकल्पाची वेळ आणि तारीखही बदलण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आता देशातील तरुणांना परकीय भाषेच्या सक्तीतून मुक्त केले जात आहे. कर्तव्याचा मार्ग हा केवळ विटा आणि दगडांचा मार्ग नसून तो भारताच्या लोकशाही भूतकाळाचा आणि सर्वकालीन आदर्शांचा जिवंत मार्ग आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025Uddhav Thackeray Video | उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? राम कदम यांची प्रतिक्रियाUddhav Thackeray : हरामखोर आहेत ते...उद्धव ठाकरेंचारोख कुणावर? पाहा संपूर्ण व्हिडीओ ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Embed widget