भयभीत पाकिस्तानला अमेरिकेचीही लाथ, दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन घेरलं, काश्मिरमधील पर्यटकांवरील हल्ला दुर्दैवी असल्याचं ठणकावून सांगितलं!
भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी पाकिस्तानवर हल्ले सुरु केले आहे.

India Pakistan War : भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी पाकिस्तानवर हल्ले सुरु केले आहे. महत्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्राचा हल्ला करण्यात आल्यानं पाकिस्तानची पळापळ सुरु झाली आहे. अशातच दहशतवादाच्या मुद्यावरुन अमेरिकेनं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना चांगलच खडसावलं आहे. पाकिस्ताननं दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. परिस्थिती आणखी बिघडू देऊ नका असे मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी व्यक्त केले आहे.
पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र हल्ल्यांचे अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानला फटकारले आहे. अमेरिकेने म्हटले आहे की पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करावी. पाकिस्तानने परिस्थिती आणखी बिघडू देऊ नये असे मार्को रुबियो म्हणाले.
पाकिस्तानचे हल्ल्याचे सगळे प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडले
पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, होशियारपूरवर या ठिकाणी ड्रोन हल्ले केले आहेत. याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. हे सगळे ड्रोन भारताने पाडले आहेत. अशातच पाकिस्तानने राजस्थानच्या सीमेवर गोळीबार सुरु केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानचे हल्ल्याचे सगळे प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडले आहेत. जम्मू काश्मीरच्या सीमा भागातही पाकिस्तानने हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. ड्रोनने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळे हल्ले भारताने परतवून लावले आहेत. तसेच राजस्थानच्या सीमेवर देखील पाकिस्तानकडून गोळीबार सुरु करण्यात आला आहे. या गोळीबाराला देखील भारताने चोख प्रत्युत्तर देखील दिलं आहे. भारताची डिफेन्स सिस्टिम एस 400 सक्रिय झाली आणि त्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोनला हवेतच लक्ष्य केलं. पाकिस्तानने ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केलेल्या ठिकाणी जम्मू विमानतळ, जम्मू रेल्वे स्टेशन, चन्नी हिम्मत आणि जम्मूला लागून असलेला सीमावर्ती भाग आरएस पुरा यांचा समावेश आहे. भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने पाकिस्तानच्या या हल्ल्याच्या प्रयत्नांना हाणून पाडले. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचे प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडले आहेत. यावर भारत काय कारवाई करेल याची माहिती भारतीय लष्कराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील या सर्व कारवाईवर लक्ष ठेवून आहेत.
महत्वाच्या बातम्या:
India Attack On Pakistan : अखेर युद्ध पेटलं... पाकिस्तानचे ड्रोन हल्ले निकामी, भारताकडून इस्लामाबाद-लाहोरवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू, नौदलाचा कराचीवर हल्लाबोल























