पाकिस्तान भारतासमोर गुडघे टेकणार? फक्त 4 दिवस पुरेल एवढाच दारुगोळा शिल्लक, अहवालातून पाकचा पर्दाफाश
भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, एक गुप्तचर अहवाल समोर आला आहे. यामध्ये पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे.

India Pakistan War : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय वायूदलाने पाकिस्तानातील प्रमुख शहरांवर रात्रभर ड्रोन हल्ले करत शत्रूला जबर धक्का दिला. यामुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, एक गुप्तचर अहवाल समोर आला आहे. यामध्ये पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. अहवालानुसार, पाकिस्तानकडे युद्ध लढण्यासाठी फक्त चार दिवसांचा दारुगोळा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत, क्षेपणास्त्र हल्ले करणारा पाकिस्तान लवकरच गुडघे टेकण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानकडे फक्त 4 दिवसांचा दारुगोळा
भारताने जर पाकिस्तानविरुद्ध पूर्ण क्षमतेनं युद्ध सुरु केले तर शेजारी देशाला शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशा परिस्थितीत, भारतीय सैन्याची रणनीती सध्या पाकिस्तानसाठी येणाऱ्या वादळासारखी आहे. पाकिस्तानी सैन्य सध्या दारुगोळ्याच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहे, ज्यामुळे त्यांची लढाऊ क्षमता फक्त चार दिवसांपर्यंत मर्यादित आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या तोफखान्यातील दारुगोळ्याचा साठा इतका कमी झाला आहे की ते केवळ 96 तासच युद्ध करू शकतात.
पाकिस्तानने अलिकडेच युक्रेन आणि इस्रायलला मोठ्या प्रमाणात 155 मिमी तोफखाना आणि 122 मिमी रॉकेटची निर्यात केली आहे. अहवालांनुसार, फेब्रुवारी ते मार्च 2023 दरम्यान, पाकिस्तानने युक्रेनला 42000 122 मिमी बीएम-21 रॉकेट आणि 60000 155 मिमी हॉवित्झर शेल पाठवले, ज्यामुळे त्यांचा देशांतर्गत साठा मोठ्या प्रमाणात संपला.
पाकिस्तान संकटात
पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीज (पीओएफ) च्या जुन्या उत्पादन सुविधा आणि वाढत्या जागतिक मागणीमुळे दारूगोळ्याच्या पुरवठ्यात अडथळा येत आहे. याशिवाय, देशाची आर्थिक स्थिती देखील गंभीर आहे, ज्यामध्ये उच्च महागाई, वाढती कर्जे आणि घटत्या परकीय चलन साठ्याचा समावेश आहे. या परिस्थितीमुळे लष्करी सराव स्थगित करणे आणि रेशनमध्ये कपात करणे यासारखी पावले उचलावी लागली आहेत. पाकिस्तानी लष्करी नेतृत्व या परिस्थितीबद्दल खूप चिंतेत आहे. 2 मे 2025 रोजी झालेल्या विशेष कॉर्प्स कमांडर्स परिषदेत या मुद्द्यावर चर्चा झाली. माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी आधीच इशारा दिला होता की पाकिस्तानकडे भारतासोबत दीर्घ युद्ध लढण्यासाठी ना दारुगोळा क्षमता आहे ना आर्थिक संसाधने. दरम्यान, भारताने पाकिस्तानला आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळे पाकिस्तानला खूप नुकसान सहन करावं लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Operation Sindoor : लढाऊ गणवेशात झळकल्या भारताच्या रणरागिणी, कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका यांच्या पोशाखाने खिळल्या नजरा, जाणून घ्या 'कॉम्बॅट ड्रेस'ची खासियत



















