India Pakistan War: आता कुरापतखोर पाकिस्तानचा सामना भारताच्या नौदलाशी; INS विक्रांतवरुन कराची बंदरावर हल्ले
India Pakistan War: पाकिस्तानचे हवाई हल्ल्यांचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर आता भारत पाकिस्तानवर आणखी एक जोरदार वार करण्याच्या तयारीत आहे. भारताच्या तिन्ही सेना अॅक्शन मोडवर असून पाकिस्तानला आता कायमचाच धडा शिकवण्यासाठी रणनिती तयार असल्याचं कळतंय.

India Pakistan War: पाकिस्ताननं (Pakistan) केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या अयशस्वी प्रयत्नांना भारतानं योग्य उत्तर दिलं आहे. यानंतर आता भारतानं पाकिस्तानच्या (India Pakistan Tension) लाहोर (Lahore) आणि सियालकोटवर ड्रोन हल्ला (Drone Attack on Sialkot) केला आहे. भारतानं लाहोरमधील AWACS हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली आहे. यापूर्वी, पाकिस्ताननं जम्मू, राजस्थान आणि पंजाबमधील अनेक भागात ड्रोन हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, ज्याला भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेनं चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
पाकिस्तानचे हवाई हल्ल्यांचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर आता भारत पाकिस्तानवर आणखी एक जोरदार वार करण्याच्या तयारीत आहे. भारताच्या तिन्ही सेना अॅक्शन मोडवर असून पाकिस्तानला आता कायमचाच धडा शिकवण्यासाठी रणनिती तयार असल्याचं कळतंय. पाकिस्तानच्या कुरापतींना जमिनीवरुन आणि हवाई हल्ले करुन चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर आता, भारतीय नौदल मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
भारतीय नौदल अरबी समुद्रात सज्ज
भारतीय लष्करानं एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे. पाकिस्ताननं केलेल्या ड्रोन हल्ल्यात कोणतंही नुकसान झालेलं नाही, असं लष्करानं म्हटलं आहे. दुसरीकडे, भारतीय नौदल देखील सक्रिय झालं आहे. कोणत्याही क्षणी भारतीय नौदल पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. अरबी समुद्रात भारतीय नौदल मोठी कारवाई केली आहे. आयएनएस विक्रांतवरुन पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ले चढवले गेले आहेत. पाकिस्तान भारताच्या तावडीत सापडलाय असंच दिसतंय.
एकीकडे भारतीय वायूदलानं आणि लष्करानं पाकिस्तानला उत्तर दिल्यानंतर दुसरीकडे भारतीय नौदल आता आक्रमणासाठी सज्ज झालं आहे. भारतीय नौदल अरबी समुद्रात सज्ज झालं असून पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे की, "दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत काम करण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचं मी मनापासून कौतुक करतो. दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलं जाईल."
पाहा व्हिडीओ : India Pakistan War : INS विक्रांतवरून पाकिस्तानमध्ये हल्ले सुरू, विमान वाहतूक मंत्रालयाचे निर्देश
महत्त्वाच्या इतर बातम्या :























