Operation Sindoor : अणवस्त्र वापराची भीती अन् भारत-पाकिस्तानचे फोन खणाणले, भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीची Inside Story
India-Pakistan News: भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अण्वस्त्र सांभाळणाऱ्या नॅशनल कमांड ऑथरिटीची बैठक बोलावली. त्यानंतर अमेरिकेने तातडीने पाऊल उचलत दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी केली.

मुंबई : भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर असलेला तणाव अचानक निवळला आणि दोन्ही देशांनी शस्त्रसंधी (India-Pakistan Ceasefire) केल्याची बातमी आली. अमेरिकेने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावून दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण केली. भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव हा अणवस्त्र युद्धाच्या दिशेने जाण्याची शक्यता असल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर खात्याकडून उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांना देण्यात आली. त्यानंतर जेडी व्हान्स आणि परराष्ट्रमंत्री रुबिया मार्को यांनी यामध्ये लक्ष घातलं आणि दोन्ही देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं 7 मेपासून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातल्या दहशतवाद्यांच्या अडड्यांना लक्ष केलं. भारताचे सर्वात मोठे शत्रू आणि कुख्यात दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं. पाकिस्ताननं सुरू केलेल्या भ्याड हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना भारतानं पाकिस्तानच्या 11 हवाई तळांना लक्ष्य केलं.
भारताच्या या कारवाईनंतर फक्त पाकिस्तानच नव्हे तर अमेरिकेच्या पायाखालची वाळू सरकली. कारण भारतानं पुढचं पाऊल उचललं असतं तर अणुहल्ल्याची धमकी देणारा पाकिस्तान स्वतःच अण्वस्त्राचा शिकार झाला असता. म्हणून सुरूवातीला या प्रकरणाशी आमचा काय संबंध अशी भूमिका घेणाऱ्या अमेरिकेला लक्ष घालण्यावाचून पर्याय उरला नाही.
India-Pakistan Ceasefire Inside Story : नेमकं काय घडलं?
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी भारत-पाक तणावात आमचा काय संबंध असं वक्तव्य 9 मे रोजी केलं होतं. पण काही तासांतच जेडी व्हान्स यांनी भूमिका बदलत संघर्षात लक्ष घातलं. व्हान्स, परराष्ट्रमंत्री रुबिया मार्को आणि व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ सुसी विलेस यांच्या बैठका झाल्या.
अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांचे संघर्षासंबंधी धोकादायक इनपुट त्यांच्या हाती आले होते. व्हान्स यांच्याकडून ट्रम्प यांना शस्त्रसंधीच्या प्लॅनची माहिती देण्यात आली. ट्रम्पसोबतच्या चर्चेनंतर व्हान्स यांचा भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन झाला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी अण्वस्त्र सांभाळणाऱ्या नॅशनल कमांड ऑथरिटीची बैठक बोलावली. नॅशनल कमांड ऑथरिटीकडे पाकिस्तानच्या अणवस्त्र वापरण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे दोन्ही देशांत अण्वस्त्रयुद्ध सुरु होऊ शकतं अशी व्हान्स आणि रुबिओंना भीती होती. पाकनं 400 ड्रोन्सचा हल्ला आणि भारताचे प्रत्युत्तर यामुळं व्हान्स आणि रुबिओ चिंतीत होते.
Operation Sindoor News : रावळपिंडितील बेसवर भारताचा हल्ला
रावळपिंडीतल्या नूर खान या एअर बेसवर भारताने हल्ला केला. त्याच्या जवळच पाकचा अण्वस्त्रसाठा आहे. पाकिस्तानकडे 170 हून अधिक अण्वस्त्रांचा साठा या ठिकाणी आहे. भारताच्या पुढच्या हल्ल्यानं अण्वस्त्रांचं रेडिएशन पाकमध्ये पसरण्याची भीती होती.
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीरला फोन गेला. त्याचवेली भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना रुबियो मार्कोंचा फोन आला. त्यानंतर सायंकाळी 5.33 वाजता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एक्स पोस्ट करत शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली.
The strike on Nur Khan Airbase (Rawalpindi) was so massive, even NASA's FIRMS satellite picked up the heat signature. pic.twitter.com/Nu9OU7TY0C
— Keshav (@Lone_wolf110) May 9, 2025























