एक्स्प्लोर

Telangana Amit Shah : तेलंगणातील 'असंवैधानिक' मुस्लिम आरक्षण रद्द करणार, अमित शाहांची घोषणा; ओवेसींचं जोरदार प्रत्युत्तर

Telangana Amit Shah : भाजपची सत्ता आल्यास तेलंगणातील मुस्लिम आरक्षण रद्द केले जाईल, असं अमित शहा म्हणाले. यावर असदुद्दीन ओवेसी यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Telangana Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मोठी घोषणा केली आहे. तेलंगणातील मुस्लिम आरक्षण घटनाबाह्य असल्याचं अमित शाहांनी म्हटलं. भाजपची सत्ता आल्यास तेलंगणातील मुस्लिम आरक्षण रद्द केले जाईल, असं अमित शहा म्हणाले. तेलंगणात रविवारी (23 एप्रिल) झालेल्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर KCR म्हणजेच के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांना फटकारले. सोबतच केसीआर हे एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या 'अजेंडा'वर चालत असल्याचा आरोप केला.

भाजप सत्तेवर आल्यानंतर 'तेलंगणा मुक्ती दिन' साजरा होणार

हैदराबादजवळ चेवेल्ला येथे "विजय संकल्प सभा" रॅलीला अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. एआयएमआयएमचे AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या विचारांप्रमाणेच केसीआर चालत असल्याचा आरोप त्यांनी केला. “भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावर हे असंवैधानिक मुस्लिम आरक्षण रद्द केले जाईल. हा अधिकार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींचा आहे आणि त्यांना त्यांचा हक्क मिळेल आणि आम्ही मुस्लिम आरक्षण रद्द करु,” केसीआरच्या सरकारने मुस्लिम कोटा 4 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या निर्णय घेतला आणि त्याच पार्श्वभूमीवर अमित शाहांनी केसीआर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 'तेलंगणा मुक्ती दिन' साजरा न केल्याबद्दल शाह यांनी केसीआर यांच्यावर हल्लाबोल केलाच शिवाय भाजप सत्तेवर आल्यानंतर हैदराबादच्या परेड ग्राऊंडवर हा दिवस भव्य पद्धतीने साजरा केला जाईल असे आश्वासनही दिले. ओवेसींच्या पक्षाला खूश करण्यासाठी तेलंगणा सरकार काश्मीरचा संपूर्ण नकाशाही दाखवत नाही, असा आरोपही अमित शाह यांनी केला. अमित शाह म्हणतात 'हा भारताचा अपमान आहे'. केसीआर यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकत नाही, ती जागा अद्याप रिक्त नाही असं म्हणत शाहांनी पुन्हा फटकारलं.

"तेलंगणात  भाजपचे सरकार निवडून येईल."

"केसीआर, 2024 मध्ये देखील नरेंद्र मोदी (Narendra Modi) पूर्ण बहुमताने पंतप्रधान होणार आहेत. त्यापूर्वी, तेलंगणातील विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर असेल आणि इथे भाजपचे सरकार निवडून येईल," असं अमित शाह यांनी केसीआर यांना उद्देशून म्हटलं. "तेलंगणातील लोकांना तुमचा (केसीआर) आणि तुमच्या कुटुंबाने केलेला भ्रष्टाचार माहिती झाला आहे. सरकारी निधीचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत आहे. तुमच्या आजूबाजूचे लोक मुख्य आरोपी आहेत आणि घोटाळ्यात गुंतलेले आहेत. लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी टीआरएस ते बीआरएस केले," असं अमित शाह म्हणाले. दरम्यान केसीआर यांनी अलिकडेच स्थापन केलेल्या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती केले आहे. 

ओवेसी यांचं शाह यांना प्रत्युत्तर 

दरम्यान, ओवेसी  Asaduddin Owaisi यांनी शाह यांच्या दाव्यावर प्रत्युत्तर देताना म्हटलंय की, आमच्यावर बोलण्यापेक्षा शाहांनी महागाई आणि बेरोजगारीबद्दल बोललं पाहिजे. ओवेसींनी ट्वीट करत अमित शाह यांना हे प्रत्युत्तर दिले आहे. “मुस्लिमविरोधी द्वेषयुक्त भाषणाशिवाय भाजपकडे तेलंगणासाठी कोणतंही व्हिजन किंवा अजेंडा नाही. ते फक्त बनावट चकमकी, हैदराबादवर सर्जिकल स्ट्राइक, कर्फ्यू, गुन्हेगारांची सुटका आणि बुलडोझर देऊ शकतात. तुम्ही तेलंगणातील लोकांचा इतका द्वेष का करता?” असे ओवेसी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. पुढे ओवेसी म्हणतात, "जर शाह एससी, एसटी आणि ओबीसींना न्याय देण्याबाबत गंभीर असतील तर त्यांनी 50 टक्के आरक्षणाच्या कोट्याची कमाल मर्यादा काढून टाकण्यासाठी घटनादुरुस्ती करावी. मागास मुस्लिम गटांसाठी आरक्षण हे प्रायोगिक डेटावर आधारित आहे. कृपया सुधीर आयोगाचा अहवाल वाचा. आपण करु शकत नसल्यास, कृपया ज्याला शक्य असेल त्याला विचारा. SC च्या स्थगितीअंतर्गत मुस्लिमांसाठी आरक्षण चालू आहे."

महत्वाच्या बातम्या : 

Nashik Asaduddin Owaisi : कोणी प्रेम करतंय तर तुम्हाला त्रास काय? प्रत्येक प्रश्नाला जातीयवाद, ओवेसी यांचा सरकारला सवाल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget