India Nepal Relation : पंतप्रधान मोदींचा नेपाळ दौरा, चीनच्या महत्वकांशी योजनेला देणार शह
India Nepal Relation : नेपाळमध्ये आपला विस्तार करून जगातील अनेक देशांवर प्रभाव असलेल्या बौध धर्म आणि खास करून तिबेटीयन बौद्ध धर्म आपल्या सोयीनुसार चालवण्याची चीनची योजना आहे.

India Nepal Relation : पंतप्रधान मोदी तब्बल चार वर्षांनंतर नेपाळच्या दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेपाळ दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांत आणखी सुधारणा होईल. शिवाय या दौऱ्यामुळे चीनच्या लुंबिनी प्रकल्पावरही परिणाम होणार आहे. लुंबिनी प्रकल्पातून रस्ते, रेल्वे मार्ग, विमानतळ यासह इतर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांद्वारे नेपाळमध्ये आपला विस्तार वाढवण्याची चीनची योजना आहे. परंतु, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे चीनच्या या योजनेला खीळ बसणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. 16 मे रोजी बुद्ध जयंती असून त्याच दिवशी पंतप्रधान मोदी नेपाळच्या दौऱ्यावर असतील.
नेपाळमध्ये आपला विस्तार करून जगातील अनेक देशांवर प्रभाव असलेल्या बौध धर्म आणि खास करून तिबेटीयन बौद्ध धर्म आपल्या सोयीनुसार चालवण्याची चीनची योजना आहे. जवळपास दोन दशकांपासून सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत चीनच्या बुद्धिस्ट असोसिएशनने नेपाळमध्ये एक बौद्ध मंदिर उभारले आहे. एवढेच नाही तर चीनच्या नॉर्थवेस्ट सिव्हिल एव्हिएशन एअरपोर्ट कंस्ट्रक्शन ग्रुपने नेपाळचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ भैरहवा येथे बुद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले आहे. हे विमानतळ लुंबिनीपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय चीन काठमांडू ते लुंबिनी रेल्वे मार्ग बांधण्याचाही प्रयत्न करत आहे.
नेपाळच्या सीमेपासून अवघ्या 25 किमी अंतरावर असलेल्या लुंबिनी आणि आजूबाजूच्या परिसरात चीनचा वाढता हस्तक्षेप भारताची चिंता वाढवणारा आहे. नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूपासून लुंबिनीचे अंतर सुमारे 326 किमी आहे. तर भारतीय सीमेपासून ते फक्त 25 किमी आहे. परंतु, तज्ज्ञांच्या मते पंतप्रधान मोदी आपल्या नेपाळ दौऱ्यात नेपाळमधील अनेक प्रकल्पांना चालणा देऊन चीनच्या योजनेला शह देऊ शकतात. त्यामुळे पंतप्रधान मोदींची ही भेट खूप महत्त्वाची ठरणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांकडून या दौऱ्यात भारताकडून लुंबिनीमध्ये एक नवीन बौद्ध प्रतिष्ठान उभारण्याची घोषणा करण्याची देखील शक्यता आहे. यामुळे नेपाळसोबत बौद्ध तीर्थक्षेत्रांची रेल्वे आणि रस्त्यांची कनेक्टिव्हीटी वाढवण्यासाठी कुशीनगर-लुंबिनीसारख्या प्रकल्पांना चालना मिळू शकते.
मोदींनी आपल्या पहिल्या पंदप्रदान पदाच्या कार्यकाळात तीन वेळा नेपाळला भेट दिली होती. परंतु, त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही त्यांची पहिलीच भेट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी काठमांडूऐवजी लुंबिनीमध्ये नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांची भेट घेणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
