India Hunger Statistics : भारतात किती लोक रोज उपाशी झोपतात? उपाशी राहणाऱ्यांची संख्या अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त
Global Hunger Index : गरिबी, अन्नवाटपातील असमानता, साठवणूक व्यवस्थेतील त्रुटी आणि अन्न वाया जाण्याची प्रवृत्ती या कारणांमुळे भारतात रोज कोट्यवधी नागरिक उपाशी झोपतात.

Global Hunger Index : भारतासारख्या प्रचंड आणि विविधतेने नटलेल्या देशात एका बाजूला मॉल्स, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये रोज कित्येक टन अन्न वाया जाते, तर दुसऱ्या बाजूला कोट्यवधी भारतीय अजूनही रात्री उपाशी पोटी झोपतात. आपण पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना कोट्यवधी नागरिक मात्र उपाशी झोपतात ही शोकांतिका आहे. ज्या देशात अन्नाची मुबलकता आहे, तिथेच उपासमारीही आहे हे वास्तव आहे.
World Food Day 2025 : जागतिक अन्न दिनाचे औचित्य
दरवर्षी 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन (World Food Day) साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संस्था (FAO) मार्फत 1945 मध्ये या दिवसाची सुरुवात झाली होती. यंदा FAO ला 80 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर उपासमार, अन्न वाया जाणे आणि कुपोषण या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले जात आहे.
Hunger in India Statistics : भारतातील उपासमारीचे चित्र
ताज्या अहवालानुसार, भारतामध्ये दररोज 19 कोटींपेक्षा जास्त लोक उपाशी झोपतात. ही संख्या अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. दरवर्षी जवळपास 40 टक्के अन्न वाया जाते, ज्याची आर्थिक किंमत तब्बल 92,000 कोटी रुपये आहे.
2021 च्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 116 देशांपैकी 101 वा होता. म्हणजेच भारतात उपासमारीची समस्या 'गंभीर' पातळीवर आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, जगात सर्वाधिक उपाशी लोक भारतातच आहेत, चीनपेक्षाही जास्त.
Reasons Behind India’s Hunger Crisis : इतकी मोठी उपासमारी का?
जगभरात दरवर्षी तब्बल 2,500 दशलक्ष टन अन्न वाया जाते. केवळ कोरोना काळाच्या आधीच 930 दशलक्ष टन अन्न खराब झाले होते. यात 63 टक्के अन्न घरांमधून, 23 टक्के रेस्टॉरंटमधून आणि 13 टक्के रिटेल दुकानदारांकडून वाया गेले. त्याचसोबत आर्थिक पातळीवरील असमतोलता हे सर्वात मोठं कारण आहे. भारतात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात असल्याने अनेकांना रात्रीचे जेवणही करता येत नाही.
भारतात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) 2013, मिड डे मील योजना, अंगणवाडी कार्यक्रम आणि सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) या योजनांच्या माध्यमातून उपासमार कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही अन्नवाटपातील असमानता, साठवणूक व्यवस्थेतील त्रुटी आणि अन्न वाया जाण्याची प्रवृत्ती या कारणांमुळे लाखो लोकांना आजही 'भूक' हीच सर्वात मोठी समस्या आहे.
ही बातमी वाचा:























