एक्स्प्लोर
पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के आयातशुल्क लादलं
ही वाढ त्वरित लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कांदा, साखर, मसाल्याचे पदार्थ यांवरची कस्टम ड्युटी वाढण्याची चिन्हं आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी ट्विट करून दिली आहे.
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यात दहशतवाद्यांनी 200 किलो स्फोटकं वापरली त्याच 200 किलोचा बदला भारतानं घेण्यास सुरुवात केला आहे. पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या सगळ्या वस्तूंवर भारतानं थेट 200 टक्के आयातशुल्क लादलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला भारतात व्यापार करणं कठिण होणार आहे, या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
ही वाढ त्वरित लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कांदा, साखर, मसाल्याचे पदार्थ यांवरची कस्टम ड्युटी वाढण्याची चिन्हं आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी ट्विट करून दिली आहे. भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढण्यावरच न थांबता सरकारनं आता पुढची पावलं उचलली आहेत. पाकिस्तानच्या मर्चंट नेव्हीची जहाजं इंधन भरण्यासाठी मुंबई आणि तिरुअनंतपुरंच्या बंदरात येतात. जर भारतानं त्यांची ती सुविधा बंद केली, पाकिस्तानी व्यापारी जहाजांनी लांबपल्ल्याचा प्रवास करणं सोपं राहणार नाही. आजही अवजड कार्गोसाठी जलमार्ग हाच परवडणारा मार्ग असतो. तिच सोय गेली तर पाकिस्तानच्या व्यापार बुडू शकतो. त्याचप्रमाणे पाकिस्तानी विमानसेवांना भारतीय अवकाशातून उड्डाणास बंदी केली तर आणखी मोठा दणका बसेल, असंही जाणकारांचं मत आहे.India has withdrawn MFN status to Pakistan after the Pulwama incident. Upon withdrawal, basic customs duty on all goods exported from Pakistan to India has been raised to 200% with immediate effect. #Pulwama
— Arun Jaitley (@arunjaitley) February 16, 2019
संबंधित बातम्या
Pulwama terror attack : दहशतवादावर हल्ला करुन नाही तर संवादातून मार्ग निघेल : नवज्योत सिंह सिद्धू
Pulwama terror attack : ना विसरणार, ना माफ करणार; पुलवामा हल्ल्यानंतर सीआरपीएफचं ट्वीट Pulwama terror attack : 'त्या' शहीद जवानाची कॅन्सरग्रस्त आई अजूनही आपल्या मुलाची वाट पाहतेय Pulwama terror attack : पत्नीला दोन महिन्यात परत येतो म्हणाला अन्... Pulwama terror attack : देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आलं : शरद पवार Pulwama terror attack : सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यावर विकी कौशल म्हणतो... Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा! Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीदअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement