एक्स्प्लोर

नेपाळकडून भारतीय भूमीचा समावेश असलेला नवीन नकाशा जारी!

नेपाळकडून भारतीय भूमीचा समावेश असलेला नवीन नकाशा जारी करण्यात आला आहे. याला कोणताही आधार नसल्याचा आक्षेप भारतीय विदेश मंत्रालयाने घेतला आहे.

नवी दिल्ली : नेपाळने नवीन नकाशा जारी केला असून त्यात लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भारतीय प्रदेश नेपाळमध्ये दाखवले आहेत. नेपाळच्या या कृतीवर भारताने आक्षेप घेतला आहे. नेपाळने नकाशात केलेले बदल हे कृत्रिम स्वरुपाचे असून त्याला कोणताही आधार नसल्याचे भारताने म्हटले आहे. नकाशामधील या बदलांना नेपाळच्या संसदेची मान्यता आवश्यकता आहे. त्यासाठी नेपाळच्या संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे.

नेपाळने लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या भारतीय प्रदेशांवर दावा केला आहे. “नेपाळच्या नकाशामध्ये बदल करण्याला सर्वपक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा बदल कायम राहणार आहे” असे नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावाली यांनी म्हटले आहे. तर, विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव म्हणाले, की भारतातील काही भागाचा समावेश नेपाळला आपल्या नकाशात करायचा आहे. मात्र, याला कोणताही आधार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारत-चीन सीमावाद | दोन्हीकडील सैन्य मागे घेण्याबाबत दोन्ही देशांचा विचार

नेपाळच्या या कृतीचा दोन्ही देशात सुरू असलेल्या सीमा वादावरील चर्चेवर परिणाम होईल, असं भारतीय विदेश मंत्रालयाने म्हटलं आहे. दोन्ही देशांमध्ये कालापाणी आणि नरसाही-सुस्ता वरुन सुरू असलेले वाद मिटवण्यासाठी 2014 पासून विदेश सचिव स्तरावर चर्चा सुरू आहे. याव्यतिरिक्त 1997 आणि 1998 मध्ये तयार झालेल्या संयुक्त कार्यदल देखील गरज पडल्यास विदेश सचिवांना मदत करू शकतो.

काय आहे वाद? नेपाळनं आपला नवीन नकाशा तयार केला आहे. यात भारतीय सीमेतील कमीत कमी तीन क्षेत्रांचा त्यात समावेश दाखवण्यात आला आहे. त्यानुसार लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी हे तीन भाग नेपाळमध्ये दाखवण्यात आले आहेत. पण हे भाग भारताच्या हद्दीत आहेत. हा नकाशा देशाच्या संसदेत मंजूर करण्यासाठी घटनेत सुधारणा करण्याचा विचार आला तेव्हा सर्व पक्ष एकत्र दिसले. यावेळी पंतप्रधान पी.पी. शर्मा ओली यांनी भारताविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

India vs Nepal | सीमेवरील गोळीबारानंतर नेपाळकडून उत्तराखंडच्या सीमेवर शस्त्रधारी जवान तैनात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड धावपळ; नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय, म्हणाले...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड धावपळ; नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय, म्हणाले...
Embed widget