India Coronavirus Updates : देशात पुन्हा कोरोना निर्बंध? आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
Coronavirus Updates in India : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होऊ शकतात.
Coronavirus Outbreak : जगभरात कोरोनाचा ( Covid19 Virus ) पुन्हा एकदा उद्रेक पाहायला मिळत आहे. चीन ( China ), ब्राझीलमध्ये ( Brazil ) पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार (Government of India ) अलर्ट झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशात पुन्हा कोरोना निर्बंध?
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी देशातील कोविड-19 परिस्थितीबाबत वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. एएनआय वृत्तसंस्थेना दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक 11:30 वाजता सुरू होईल. या बैठकीमध्ये इतर देशांतील कोविड 19 परिस्थितींचाही आढावा घेण्यात येईल. यानंतर परिस्थिती पाहता नवे निर्बंध लागू होण्याबाबत निर्णय होऊ शकतो.
Union Health Minister Dr Mansukh Mandaviya to hold a meeting with senior officials and experts on the COVID-19 situation in the country tomorrow: Sources pic.twitter.com/8CYmNaIHS8
— ANI (@ANI) December 20, 2022
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी
देशात सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे. दररोज नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखी घटली आगे. देशात काल 112 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. काही महिन्यांपूर्वी दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. आतापर्यंत देशात 4 कोटी 46 लाख 76 हजार 199 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील 4 कोटीहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.
India records 112 new COVID-19 cases, infection tally rises to 4,46,76,199. Death toll stands at 5,30,677, count of active cases now 3,490: Union Health Ministry
— Press Trust of India (@PTI_News) December 20, 2022
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर
कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने (Covid-19) डोकं वर काढला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. चीनमधील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून रुग्णालयात खाटा आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.