एक्स्प्लोर

India Corona Updates : देशात 40 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद, गेल्या 24 तासांत 460 रुग्णांचा मृत्यू

India Coronavirus Updates : गेल्या 24 तासांत 41,965 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 460 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. तर 33,964 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

India Coronavirus Updates : भारतात एका दिवसात 40 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एक दिवसापूर्वी देशात 30,941 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. आज बुधवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 41,965 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 460 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 33,964 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

यापूर्वी देशात सलग पाच दिवस 40 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. बुधवारी 46164, गुरुवारी 44658, शुक्रवारी 46759, शनिवारी 45083 आणि सोमवारी 42909 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचं मुख्य कारण म्हणजे, केरळात वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव. केरळात काल दिवसभरात कोरोनाच्या 30,203 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

भारतात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 

कोरोनाच्या महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 28 लाख 10 हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 4 लाख 39 हजार 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की, आतापर्यंत 3 कोटी 19 लाख 93 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण 3 लाख 78 हजार रुग्ण अद्यापही कोरोनाशी झुंज देत आहेत. 

देशातील कोरोनाची सद्यस्थिती :

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 28 लाख 10 हजार 845
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 19 लाख 93 हजार 644
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 78 हजार 181
एकूण मृत्यू : चार लाख 39 हजार 20
एकूण लसीकरण : 65 कोटी 41 लाख 13 हजार लसीचे डोस

राज्यात काल (बुधवारी)  4,196 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 104 रुग्णांचा मृत्यू

राज्यात काल (बुधवारी) 4,196 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 688  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 72 हजार 800 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 03 टक्के आहे. 

राज्यात काल (बुधवारी) 104 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 37 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 51 हजार 238 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 515 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (49), नंदूरबार (3),  धुळे (22), जालना (17), परभणी (38), हिंगोली (59),  नांदेड (27),  अमरावती (95), अकोला (20), वाशिम (8),  बुलढाणा (44), यवतमाळ (8), नागपूर (70),  वर्धा (5), भंडारा (7), गोंदिया (2),  गडचिरोली (32) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. 

जळगाव, जालना,  हिंगोली, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा,  गोंदिया, चंद्रपूर या पाच जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 39,76,886 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,64,876 (11.98 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,91,701 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,121  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत गेल्या 24 तासात 323 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 323 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 272 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,621 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3106 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1511 दिवसांवर गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget