एक्स्प्लोर

India Coronavirus Cases Today : देशात 24 तासांत 2023 रुग्णांचा मृत्यू, नव्या कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर

India Coronavirus Cases Today : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्यानं वाढ होत आहे. तसेच देशाच्या मृत्यूदरातही झपाट्यानं वाढ होत आहे. अशातच गेल्या 24 तासांत 295,041 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2023 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

India Coronavirus Cases Today : देशभरात 13 कोटी लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. तरिही कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. दररोज नव्या कोरोनाबाधितांचा आकडा नवनवे उच्चांक रचत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 295,041 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2023 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 1,67,457 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यापूर्वी शनिवारी 259,167 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. 

देशातील आजची कोरोना स्थिती

एकूण कोरोना बाधित रुग्ण : एक कोटी 56 लाख 16 हजार 130
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 32 लाख 76 हजार 039 
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 21 लाख 57 हजार 538
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 82 हजार 553
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 13 कोटी 1 लाख 19 हजार 310 डोस 

राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच, काल (मंगळवारी) तब्बल 62 हजार नवीन कोरोना बाधित 

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. काल 62 हजार 97 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 54 हजार 224 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 13 हजार 464 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 83 हजार 856 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.14 टक्के  झाले आहे. दरम्यान, आज 519 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 1.55 एवढा झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,43,41,736 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 39,60,359 (16.27 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38,76,998 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 27,690 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्र आता कोरोना लसी परदेशातून आयात करणार

राज्यातील लसीकरणाचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी राज्य सरकार आता परदेशातून कोरोनाच्या लसी आयात करणार आहे. तसेच ब्रिटनच्या धर्तीवर राज्यातील सर्व खात्यांचा फंड आता कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

देशातील 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून  महाराष्ट्र सरकारने  या निर्णयाचे स्वागत केलं आहे. राज्यात आता व्यापक स्तरावर लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार असून त्याला निधी कमी पडला तर ब्रिटनच्या धर्तीवर राज्यातील सर्व खात्यांच्या फंडात कपात करण्यात येईल आणि तो फंड लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Coronavirus | महाराष्ट्र आता कोरोना लसी परदेशातून आयात करणार, लसीकरणाचा कार्यक्रम व्यापक करण्याचा निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
Kalyan Dombivli Shivsena and MNS Yuti: कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
Kishori Pednekar Shivsena UBT Group Leader: ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Pratibha Dhanorkar On Vijay Wadettiwar : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, चंद्रपूरात प्रतिभा धानेकर आणि विजय वडेट्टीवार वाद शिगेला
Gosikhurd Project Special Report गोसेखुर्द काठोकाठ पण 38 वर्षांपासून गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
Kalyan Dombivli Shivsena and MNS Yuti: कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
Kishori Pednekar Shivsena UBT Group Leader: ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
मोठी बातमी : कल्याण डोंबिवलीत मनसेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा
मोठी बातमी : कल्याण डोंबिवलीत मनसेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा
Share Market Today: सेन्सेक्स 1 हजार अंकांनी घसरत 81,100 वर पोहोचला, निफ्टी देखील 200 अंकांनी घसरला; 2 दिवसांत तब्बल 2 हजार अंकानी आदळला
सेन्सेक्स 1 हजार अंकांनी घसरत 81,100 वर पोहोचला, निफ्टी देखील 200 अंकांनी घसरला; 2 दिवसांत तब्बल 2 हजार अंकानी आदळला
शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
BMC Mayor Reservation 2026: मुंबईतील ठाकरेंच्या दोन हुकमी एक्क्यांवर सत्ताधाऱ्यांची नजर; कोण आहेत ते नगरसेवक, नेमकं कारण काय?
मुंबईतील ठाकरेंच्या दोन हुकमी एक्क्यांवर सत्ताधाऱ्यांची नजर; कोण आहेत ते नगरसेवक, नेमकं कारण काय?
Embed widget