Coronavirus Cases : कोणत्या राज्यात आज किती रुग्णांची वाढ? पाहा काय आहे परिस्थिती
India coronavirus cases : देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना महाराचीचं सावट गडद झाले आहे. दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
India coronavirus cases : देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना महाराचीचं सावट गडद झाले आहे. दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मागील २४ तासांत देशभरात एक लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले होते. त्याआधी ९० हजार रुग्णाची नोंद झाली होती. दिवसागणिक वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येमुळे अनेक राज्यात निर्बंध लावण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट न झाल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्लीसह केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्याही मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट अधिक गडद होऊ शकते. पाहूयात आज, कोणत्या राज्यात किती रुग्ण आढळले....
महाराष्ट्र -
राज्यात आज तब्बल 40 हजार 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14, 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही आतापर्यंत 876 ओमायक्रॉन बाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 435 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
पश्चिम बंगाल -
राज्यात आज 18,213 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. तर याच कालावधीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
दिल्ली -
मागील २४ तासांत दिल्लीत 17,335 इतके नवे रुग्ण आढळले आहेत. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपासून दिल्लीमध्ये विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर शाळाही बंद करण्यात आल्या आहेत.
कर्नाटक -
कर्नाटक राज्यात आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा स्फोट झाला आहे. मागील २४ तासांत नव्या 8449 रुग्णाची भर पडली आहे. याच कालावधीत ५०५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
तामिळनाडू -
तामिळनाडूमध्ये २४ तासांत 8,981 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. याच कालावधीत 984 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
केरळ -
राज्यात मागील २४ तासांत 5,296 नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 2,404 जणांनी कोरोनावर मात केली आहे. केरळमध्ये आज २५ नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या ३०५ झाली आहे.
झारखंड -
झारखंड राज्यात मागील २४ तासांत 3,825 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. याच कालावधीत ८ जणांचा मृत्यू झाला तर 866 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
हरियाणा -
राज्यात मागील २४ तासांत 3,748 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. हरियाणा राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 8.11% इतका झाला आहे.
पंजाब -
पंजाब राज्यात मागील २४ तासांत २९०१ नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. याच कालावधीत एका रु्गणाचा मृत्यू झाला आहे.
गोवा राज्यात आज 1432 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. याच कालावधीत दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आसाम -
राज्यात मागील २४ तासांत 1,167 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3.32% इतकी झाली आहे.
जम्मू काश्मिरमध्ये मागील २४ तासांत 542 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. राज्यातील अॅक्टिव रुग्णाची संख्या 2,492 इतकी झाली आहे.
चंदीगढ -
चंदीगढमध्ये २४ तासांत ३९० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत ८ रुग्णांचा मृत्यू झाला तर ४६ जणांनी कोरोनावर मात केली,