Corona Vaccination Phase 3: लसीकरणाचा वेग वाढणार, 18 वर्षांवरील सर्वांना लसीसह केंद्राचे 'हे' देखील महत्वाचे निर्णय
Corona Vaccination Phase 3: केंद्र सरकारने लसीकरणासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व जण लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
![Corona Vaccination Phase 3: लसीकरणाचा वेग वाढणार, 18 वर्षांवरील सर्वांना लसीसह केंद्राचे 'हे' देखील महत्वाचे निर्णय India Corona Vaccination Phase 3 Announced 1st May Pricing Everyone above 18 eligible Covid-19 Vaccine Corona Vaccination Phase 3: लसीकरणाचा वेग वाढणार, 18 वर्षांवरील सर्वांना लसीसह केंद्राचे 'हे' देखील महत्वाचे निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/19/48b65120605c0f401061206f42523347_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत केंद्र सरकारने लसीकरणासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व जण लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त भारतीयांना कमीत कमी वेळेत लस दिली जावी यासाठी सरकार मागील एक वर्षापासून प्रयत्न करत आहे. देशात लसीकरण वेगाने सुरु आहे, पुढेही ही गती कायम राहणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
Corona Vaccination Phase 3: 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
सर्वांना कोरोनाची लस दिली जावी अशी मागणी देशभरातून केली जात आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांचा समावेश होता. तर दुसऱ्या टप्यात 45 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लसीकरणाचा टप्पा वाढवण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आज पंतप्रधान मोदी यांनी काही औषध कंपन्यांसोबत देखील बैठक झाली. भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लस दिल्या जात आहेत. स्पुटनिक व्हीला सुद्धा आपत्कालीन मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लसीकरण मोहीमेला येत्या दिवसात वेग येणार असल्याचे दिसत आहे.
लसीकरणाबाबत हे ही महत्वाचे निर्णय
- लस उत्पादक कंपनी कडून राज्यांना थेट पुरवठाही होऊ शकणार आहे.
- लस आता निर्धारित किमतीत खुल्या बाजारातही विकत घेता येणार.
- 50 टक्के साठा दर महिन्याला केंद्राला आणि 50 टक्के साठा राज्य किंवा खुल्या बाजारात विक्री लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या करू शकतात
- 1 मे नंतर प्रत्येक ठिकाणच्या नोंदणीत प्राधान्य 45 वर्षांपेक्षा अधिकच्या लोकांच्या दुसऱ्या डोसला असणार आहे.
- पंचेचाळीस वर्षांपेक्षा जास्त वयोगट, फ्रंटलाईन वर्कर्स, हेल्थ वर्कर्स यांनाच मोफत लस
- याशिवाय लस उत्पादकांना 50 टक्के साठा राज्य सरकारला द्यावा लागणार
- देशात कोरोनावरील लसीकरणासाठी सरकारी केंद्र आणि खासगी रुग्णालयामध्ये लस घेता येणार आहे.
- सरकारी केंद्रांवर मोफत लस दिली जात आहे. तर खासगी रुग्णालयात एका डोससाठी 250 रुपये आकारले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)