Corona Vaccination Phase 3: 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व जण लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत केंद्र सरकारने लसीकरणासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व जण लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Govt of India announces liberalised & accelerated Phase 3 strategy of COVID-19 vaccination from May 1; everyone above the age of 18 to be eligible to get vaccine pic.twitter.com/7G3WbgTDy8
— ANI (@ANI) April 19, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त भारतीयांना कमीत कमी वेळेत लस दिली जावी यासाठी सरकार मागील एक वर्षापासून प्रयत्न करत आहे. देशात लसीकरण वेगाने सुरु आहे, पुढेही ही गती कायम राहणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
Maharashtra Lockdown : कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार
सर्वांना कोरोनाची लस दिली जावी अशी मागणी देशभरातून केली जात आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांचा समावेश होता. तर दुसऱ्या टप्यात 45 वर्षांवरील सर्वांच लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा सुरळीत करण्यासाठी लालपरीचे चालक बजावणार महत्त्वाची भूमिका
भारतात अतापर्यंत 12.38 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 18,37,373 सत्राद्वारे लसीच्या 12,38,52,566 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 91,36,134 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ), 57,20,048 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 1,12,63,909 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा), 55,32,396 फ्रंट लाईन कर्मचारी (दुसरी मात्रा ), 60 वर्षावरील 4,59,05,265 लाभार्थी ( पहिली मात्रा ), 40,90,388 (दुसरी मात्रा ), 45 ते 60 वयोगटातल्या 4,10,66,462 ( पहिली मात्रा ) आणि 11,37,964 (दुसरी मात्रा ) यांचा समावेश आहे.
देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 59.42% मात्रा आठ राज्यात देण्यात आल्या आहेत.