एक्स्प्लोर

India Corona Updates : देशात 24 तासांत 36 हजार नवे कोरोनाबाधित; 70 टक्के रुग्ण फक्त केरळात

India Coronavirus Updates : गेल्या 24 तासांत 36,401 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 530 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. बुधवारी देशात 35,178 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

India Coronavirus Updates : भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाली आहे. केरळ एकमात्र असं राज्य आहे, जिथे कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. एकूण आकडेवारीपैकी 70 टक्के कोरोना रुग्णांची नोंद फक्त केरळात होत आहे. गुरुवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 36,401 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 530 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. बुधवारी देशात 35,178 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच 24 तासांत 39,157 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

70 टक्के रुग्ण केवळ केरळात 

केरळात बुधवारी कोरोनाच्या 21,427 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. म्हणजेच, 70 टक्के रुग्ण केवळ केरळातीलच आहेत. अशातच कोरोना महामारीनुळे 179 रुग्णांचा मृत्यू झाला होता. केरळात नव्या कोरोनाबाधितांसोबतच एकूण बाधितांची संख्या वाढून 37 लाख 25 हजार झाली आहे. तर मृतांचा आकडा 19,049 वर पोहोचला आहे. एका दिवसात 18,731 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

कोरोनाची एकूण आकडेवारी 

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 23 लाख 22 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 33 हजार 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्टी म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 15 लाख 25 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. सध्या एकूण 3 लाख 64 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

देशातील सध्याची कोरोनास्थिती : 

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 23 लाख 22 हजार 258
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 15 लाख 25 हजार 80
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 64 हजार 129
एकूण मृत्यू : चार लाख 33 हजार 49
लसीकरणाची एकूण आकडेवारी : 56 कोटी 64 लाख 88 हजार लसींचे डोस

राज्यात काल (बुधवारी) 5,132 नव्या कोरोनाबाधितांची भर तर 158 जणांचा मृत्यू

राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ  लागली आहे. काल (बुधवारी) 5,132 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 196 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 09 हजार 364 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.93टक्के आहे. 

राज्यात काल (बुधवारी) 158 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 37 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  58 हजार 069 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (0),  धुळे (6), परभणी (15), हिंगोली (75),   नांदेड (50), अमरावती (84), अकोला (27), वाशिम (3),  बुलढाणा (37), यवतमाळ (13), वर्धा (5), भंडारा (5), गोंदिया (2),  गडचिरोली (32) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 325 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

भिवंडी निजामपूर, धुळे, जळगाव महानगरपालिका, नंदूरबार,  परभणी,   अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर सोलापूरमध्ये सर्वाधिक 756 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 14,89, 080 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,06, 345 (12.44 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,46,290 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 371 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget