भारतीय हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकाला भारताने परत पाठवलं; चिनी सरकारी मीडियाची माहिती
भारतीय सैन्य दलाने भारतीय हद्दीत आलेल्या एका चिनी सैनिकाला परत पाठवलं आहे. यासंदर्भात चीनमधील वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने यासंदर्भात माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : चीनमधील सरकारी मीडिया ग्लोबल टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने एका चिनी सैनिकाला चीनमध्ये परत पाढवलं आहे. चिनी सैनिक डेमचोक सेक्टरमध्ये फिरत असताना रस्ता चुकून भारतीय हद्दीत आला होता. त्यानंतर भारतीय जवानांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. आता त्याची चौकशी केल्यानंतर भारतीय सैन्य दलाने त्याला चिनीमध्ये परत पाठवलं आहे.
चीनमधील वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने ट्वीट केलं आहे की, 'रविवारी चीन-भारत सीमेजवळ याक शोधण्यासाठी मदत करत असताना एक चीनी सैनिक भारताच्या हद्दीत आला होता. बुधवारी या सैनिकाला भारतीय सैन्याने चीन सीमारेषेवरील सैनिकांकडे या सैनिकाला सोपावलं आहे.'
The #PLA soldier, who went missing while helping herdsman find yak near #China-#India border on Sunday, has been returned to Chinese border troops by Indian army early on Wednesday, PLA News reported. https://t.co/8gljTdoFwQ
— Global Times (@globaltimesnews) October 20, 2020
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्याने चिनी सैनिकाला परत पाठवले
लडाखमधील चुमार-डेमचोक परिसरात एका चिनी सैनिकाला भारतीय सैनिकांनी सोमवारी पकडलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी हा सैनिक चुकून भारतीय हद्दीत आल्याची शंका भारतीय सैन्य दलाने व्यक्त केली होती. त्यावेळी बोलताना सैन्य दलाने सांगितलं होतं की, 'पूर्व लडाख येथील डेमचोकमधील पीएलएचा एक सैनिक कॉर्पोरल वांग यां लॉन्ग याला पकडण्यात आलं. तो नियंत्रण रेषेजवळ फिरत होता. ताब्यात घेण्यात आलेल्या सैनिकाला ऑक्सिजन, अन्न आणि गरम कपडे यांसारख्या सुविधांसह वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.' तसेच प्रस्थापित शिष्टाचारानुसार, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चुशूल-मोल्डो येथे या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवले जाईल, असे सैन्याकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार या सैनिकाला चीनकडे सोपवण्यात आले आहे.
भारत-चीन सीमेवर गेल्या सहा महिन्यांपासून तणाव
दरम्यान, जवळपास गेल्या सहा महिन्यांपासून भारत-चीन या दोन्ही देशांमध्ये सीमावाद सुरु आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी अनेक स्तरांवरील रानितिक आणि सैन्य दलांमधील बैठका पार पडल्या आहेत. परंतु, या सर्व बैठकींमधून काही खास निष्कर्ष हाती आलेले नाहीत. 21 सप्टेंबर रोजी सैन्य दलांमधील बैठकीनंतर दोन्ही पक्षांनी अनेक निर्णयांची घोषणा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या :
भारताच्या हद्दीतून चीनला कधी हाकलणार ते सांगा, राहुल गांधींचा मोदींना प्रश्न
घुसखोरी करण्यासाठी LOC वर सुरुंग! JeM आणि हिजबुलच्या दहशतवाद्यांच्या मदतीने पाकिस्तानचा कट