घुसखोरी करण्यासाठी LOC वर सुरुंग! JeM आणि हिजबुलच्या दहशतवाद्यांच्या मदतीने पाकिस्तानचा कट
गुप्तचर यंत्रणांना LOC वर पाकिस्तानकडून बोगदा खोदल्याची माहिती मिळाली आहे. हा बोगदा भारतीय सीमेवर कोणत्या बाजूने निघेल हे सांगणे अवघड आहे.
काश्मीर : देशाच्या सुरक्षेबाबत गुप्तचर यंत्रणांनी आपल्या अहवालात मोठा खुलासा केला आहे. जैश आणि हिजबुलचे दहशतवादी पाकिस्तानी रेंजर्सच्या देखरेखीखाली बोगद्याचे उत्खनन करत असल्याची माहिती समोर आली आहे. या बोगद्याची उंची 5 फूट आणि रुंदी 3 ते 4 फूट आहे. दहशतवाद्यांव्यतिरिक्त पाक रेंजर्सही बोगद्यावर पहारा देत आहे. पाक रेंजर्ससमवेत दहशतवाद्यांचा एक गट आसपास नजर ठेवून आहे.
या गुप्तचर अहवालानुसार जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी पाकिस्तानी रेंजर्सच्या देखरेखीखाली एलओसीवर बोगदे खोदत आहेत. हे बोगदे भारतीय सीमेच्या दिशेने खोदले जात आहेत . आवाज येऊ नये म्हणून हे बोगदे लोखंडी पाईप आणि फायबर टिनने खोदले जात आहेत.
भारतात बोगद्याचे स्थान स्पष्ट नाही
हा बोगदा भारतीय सीमेवर कोणत्या बाजूने निघेल, हे सांगणे कठीण आहे. इंटेलिजन्स रिपोर्टनुसार एक्झिट पॉइंटवर बोगदा बहुमुखी करण्याचा कट रचला जात आहे. बोगद्याची उंची पाच फूट आणि रुंदी तीन ते चार फूट आहे. त्याचे तोंड भारतीय सीमेकडे अडीच फूट ठेवले जाण्याची शक्यता आहे.
सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची यशस्वी चाचणी
याच वर्षी जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये एक बोगदा सापडला होता. या बोगद्यातून घुसखोरी व शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता पाकिस्तानने हिझबुल आणि जैश सारख्या दहशतवादी संघटनांना नवीन बोगदे खोदण्याचे काम दिले आहे. यापूर्वी सन 2017 मध्ये पाकिस्तानने भारतीय सीमेत बोगदे खोदले आहेत.
'भारतात हेरगिरीसाठी पाकिस्तान शोधतंय एजंट', नाशिक पोलिस आयुक्तांकडून सावधगिरीच्या सूचना