Tawang Border Clash: 'एलएसीवरील परिस्थिती भारताच्या नियंत्रणात', तवांग चकमकीवर ईस्टर्न कमांडच्या प्रमुखांची पहिली प्रतिक्रिया
India China Border Clash: तवांगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर ईस्टर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आरपी कलिता (RP Kalita) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
India China Border Clash: तवांगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर ईस्टर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आरपी कलिता (RP Kalita) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी शुक्रवारी (16 डिसेंबर) सांगितले की, पीएलएने (PLA) (LAC) एलएसी ओलांडली, परिणामी याविरोधात दोन्ही बाजूंचे सैनिक जखमी झाले. या प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवला गेला आहे. यासंदर्भात बुमला येथे फ्लॅग मिटिंग झाली, आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
ईस्टर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आरपी कलिता पुढे म्हणाले की, लष्करी जवान या नात्याने आपण आपल्या देशाचे रक्षण करण्यास सदैव तयार असतो. शांतता असो वा संघर्ष, बाह्य किंवा अंतर्गत धोक्यांपासून देशाची प्रादेशिक अखंडता सुनिश्चित करणे, हे प्राथमिक कार्य आहे. आम्ही सर्व परिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितींसाठी तयार आहोत. लेफ्टनंट जनरल आरपी कलिता कोलकाता येथे विजय दिवसाच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त पुष्पहार अर्पण समारंभात माध्यमांशी बोलत होते.
या घटनेबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन लेफ्टनंट जनरल आरपी कलिता केले आहे. ते म्हणाले की, मला सांगायला आनंद होत आहे की, स्थानिक पातळीवर त्याचे नियंत्रण आहे. दोन्ही बाजूंच्या जवानांना किरकोळ दुखापत झाली असली तरी, मी तुम्हालाही विनंती करू इच्छितो की कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, उत्तरेकडील सीमेवरील सीमावर्ती भागात आमचे नियंत्रण आहे.
दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये झाली होती झडप
9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से येथे चीन आणि भारताचे सैनिक आमनेसामने आले होते. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या या चकमकीत अनेक जवान जखमी झाले. जखमी जवानांपैकी बहुतांश चीनचे होते. यानंतर दोन्ही लष्कराच्या कमांडर्सनी फ्लॅग मिटिंग घेऊन परिस्थिती हाताळली. त्यानंतर दोन्ही देशांचे सैनिक मागे हटले.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेत सांगितले की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से सेक्टरमध्ये एकतर्फी स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. भारतीय लष्करी कमांडर्सनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे चिनी सैन्य आपल्या सिमेत परतले. राजनाथ सिंह म्हणाले की, आपले सैन्य आपल्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यावरील कोणताही प्रयत्न हाणून पाडत राहील.