(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Narendra Modi : भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावलं उचलणार, देश लुटून पळून गेलेल्यांना परत आणणार : पंतप्रधान मोदी
Independence Day PM Modi Speech Live : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केलं आहे.
PM Narendra Modi Speech : आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केलं. यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांनी स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी म्हटलं की, भारतातच नाही तर जगभरात कानाकोपऱ्यात भारतीयांनी राष्ट्रध्वज फडकवत त्याचा मान वाढवला आहे. संपूर्ण जगभरात भारताचा राष्ट्रध्वज अभिमानानं फडकतोय. जगभरात पसरलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं आहे की, 'हा 75 वर्षांचा प्रवास चढउतारांनी भरलेला आहे. सुख-दुःखातही देशवासीयांनी प्रयत्न केले. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने भारतीयांच्या भावना दुखावल्या होत्या. त्या परिस्थितीतही भारतीय लढले. स्वातंत्र्यानंतर देश फुटेल आणि लोक लढतील, अशी भारताची खिल्ली उडवली गेली. भारताच्या मातीत अनन्यसाधारण शक्ती आहे, हे भारतानं वेळोवेळी सिद्ध केलं आहे.'
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधानांचा निशाणा
पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निशाणा साधत म्हटलं आहे की, कोणाकडे राहायला जागा नाही आणि तर कुणाकडे चोरीचा माल ठेवायला जागा नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गेल्या आठ वर्षांत, आम्ही थेट लाभ हस्तांतरण करून दोन लाख कोटी रुपयांची बचत केली आहे. हा पैसा चुकीच्या हातात जायचा. पूर्वीच्या सरकारांमध्ये बँका लुटून पळून गेलेल्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही एका गंभीर पाऊलं उचलत आहोत, असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे.
पंतप्रधानांकडून महिला योद्धांना अभिवादन
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या महिला योद्धांना पंतप्रधानांनी अभिवादन केलं. पंतप्रधानांनी म्हटलं की, भारतातील महिला काय करू शकतात हे सांगण्याची गरज नाही. स्वातंत्र्यासाठी अनेक वीर महिला योद्धांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण करून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून येतो. राणी लक्ष्मीबाई, दुर्गाभाभी, बेगर हजरत महल या पराक्रमी महिला योद्धांना अभिवादन.'
'बलिदान देणाऱ्यां प्रति नतमस्तक होण्याची संधी'
भारतातील असा एकही कोपरा नव्हता, असा कोणताही काळ नव्हता, जेव्हा देशवासियांनी शेकडो वर्षे गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही, आपले आयुष्य पणाला लावलं नाही, यातना सहन केल्या नाहीत, बलिदान दिलं नाही. आज सर्व देशवासियांना अशा प्रत्येक महापुरुषाला, प्रत्येक बलिदानाला आणि त्याग करणाऱ्या प्रति नतमस्तक होण्याची संधी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
'मेड इन इंडिया' मोहिमेला चालना
देशाला आत्मनिर्भर बनण्याची गरज आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. टमेड इन इंडिया मोहिमेला चालना मिळाली आहे. यंदा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षपूर्ती वेळी स्वदेशी 21 तोफांची सलामी देण्यात आली. आत्मनिर्भर भारत योजनेचा उद्देश जगाला भारताची ताकद दाखवणं आहे. जागतिक बाजारात स्वदेशीला स्थान मिळवून देणं आपलं ध्येय असेल.', असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान'
पंतप्रधान मोदी यांनी 'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान'ची घोषणा केली आहे. लाल बहादूर शास्त्रींनी 'जय जवान, जय किसान'चा नारा दिला. यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी त्यात 'जय विज्ञान' जोडले. आणि आता त्यात 'जय अनुसंधान' जोडण्याची वेळ आली आहे. आता 'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', असा नारा पंतप्रधानांनी दिला आहे.
'पंचप्राण' वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
येत्या काळात आपण 'पंचप्राण' वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पहिले - विकसित भारताचे मोठे संकल्प आणि संकल्प घेऊन पुढे जा; दुसरे - गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका; तिसरे - आपल्या वारशाचा अभिमान बाळगा; चौथे - एकतेचे सामर्थ्य आणि पाचवे - नागरिकांची कर्तव्ये ज्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल, असंही पंतप्रधान मोदी यांन म्हटलं आहे.