Independence Day 2022 : जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Independence Day PM Modi Live Updates : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचंच नव्हे तर जगाचे लक्ष लागलं आहे. वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
LIVE
Background
Independence Day 2022 PM Modi Live Updates : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. गेल्या 75 वर्षात भारत कोणत्या कठीण काळातून गेला आणि आज तो जगाला कशा प्रकारे दिशा दाखवत आहे, याचा उल्लेख पंतप्रधान आपल्या भाषणात करू शकतात.
लाल किल्ल्यावरून 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि मेक इन इंडियाच्या योगदानाबद्दल बोलू शकतात. कोरोनाच्या काळात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारतावर भर दिला होता. त्यांनी वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टवर भर दिला होता. जगभरातील निर्देशांक देखील भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे दर्शवत आहेत.
डिजिटल पेमेंटचा करू शकतात उल्लेख
आज डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात भारत गेल्या काही वर्षांत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. 2021-22 मध्ये 7,422 कोटी रुपयांच्या व्यवहारांसह भारत डिजिटल पेमेंट इकोसिस्टममध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे. पंतप्रधान आपल्या भाषणात भारताच्या या कामगिरीची चर्चा करू शकतात. युक्रेन युद्ध असो किंवा जागतिक मंदी, भारत अजूनही त्याच्या प्रभावापासून दूर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या या ताकदीवर आणि लवचिकतेवर पंतप्रधान आपल्या भाषणात बोलू शकतात.
लाल किल्ल्यावरून आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी कोरोनाच्या काळात भारताच्या आरोग्य क्षेत्रातील अनेक सुधारणांचा उल्लेख करू शकतात. देशातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांटपासून व्हेंटिलेटरची उपलब्धता वाढली आहे, यावरही पंतप्रधान बोलू शकतात. कोरोना लस आणि जगातील सर्वात मोठा लसीकरण करणारा देश म्हणून भारताचे यश, त्यात नागरिकांचे सहकार्य यांचाही पंतप्रधान उल्लेख करू शकतात.
76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात त्या हुतात्म्यांचे विशेष स्मरण करतील, ज्यांच्या हौतात्म्याशिवाय स्वातंत्र्य मिळणे शक्य नव्हते. तसेच 'हर घर तिरंगा' मोहिमेचाही पंतप्रधान उल्लेख करू शकतात. या मोहिमेअंतर्गत देशातील 27 कोटी घरांमध्ये तिरंगा फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.
पंतप्रधान मोदी क्रीडा क्षेत्रातील भारताच्या वाढत्या पराक्रमाचाही उल्लेख करू शकतात. अलीकडेच भारताने CWG गेम्समध्ये 22 सुवर्णांसह 61 पदके जिंकली आहेत. भारताचे खेळाडू प्रत्येक मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन खेळांमध्ये पदके जिंकत आहेत. देशासमोर विशेषत: क्रीडा क्षेत्रात महिला खेळाडूंच्या वाढत्या योगदानाचाही पंतप्रधान उल्लेख करू शकतात.
Independence Day 2022 : आत्मनिर्भर भारत, हा सरकारचा अजेंडा किंवा सरकारी कार्यक्रम नाही, हे समाजाचं जनआंदोलन आहे : पंतप्रधान मोदी
Independence Day 2022 : आत्मनिर्भर भारत, ही प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक सरकारची, समाजाच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. आत्मनिर्भर भारत, हा सरकारचा अजेंडा किंवा सरकारी कार्यक्रम नाही. हे समाजाचं जनआंदोलन आहे, जे आपल्याला पुढे न्यायचं आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
India Independence Day 2022 : जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
India Independence Day 2022 : लाल बहादूर शास्त्रींनी 'जय जवान, जय किसान'चा नारा दिला. यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी त्यात 'जय विज्ञान' जोडले. आणि आता त्यात 'जय अनुसंधान' जोडण्याची वेळ आली आहे. आता 'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान' : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Independence Day 2022 : दैनंदिन जीवनात स्त्रीला अपमानित करणाऱ्या सर्व गोष्टींपासून मुक्त होण्याची प्रतिज्ञा आपण घेऊ शकतो का? : पंतप्रधान मोदी
Independence Day 2022 : माझी एक वेदना आहे. ही व्यथा मी देशवासियांसमोर मांडणार नाही, तर कुठे बोलणार? आज कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या भाषणात विकृती निर्माण झाली आहे. स्त्रियांचा अनादर केला जातो. दैनंदिन जीवनात स्त्रीला अपमानित करणाऱ्या सर्व गोष्टींपासून मुक्त होण्याची प्रतिज्ञा आपण घेऊ शकतो का? : पंतप्रधान नरेंद्र मोदी
India Independence Day 2022 : 'भारत प्रथम' हे सूत्र आपल्याला पाळायला हवं, यामुळे अखंड भारताचा मार्ग मोकळा होईल : पंतप्रधान मोदी
India Independence Day 2022 : 'भारत प्रथम' हे सूत्र आपल्याला पाळायला हवं, जेणेकरुन अखंड भारताचा मार्ग मोकळा होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
India Independence Day 2022 : आपल्याला आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा : पंतप्रधान मोदी
India Independence Day 2022 : आज, आपण 'डिजिटल इंडिया' उपक्रम पाहत आहोत, देशात स्टार्टअप वाढवत आहेत आणि टियर 2 आणि 3 शहरांमधून भरपूर प्रतिभा समोर येत आहेत. आपल्याला आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी