Delhi Air Pollution : दिल्लीत प्रदूषणाच्या पातळीत वाढ, हवा गुणवत्ता निर्देशांक 290 वर
दिल्लीत सातत्याने हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) खराब श्रेणीत येत आहे. आज सकाळी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक हा २९० इतका नोंदवण्यात आला आहे.

Air Pollution : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत दिवसेंदिवस प्रदूषणाची पातळी चांगलीच खालावत आहे. दिल्लीत सातत्याने हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) खराब श्रेणीत येत आहे. आज सकाळी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक हा २९० इतका नोंदवण्यात आला आहे. हवा गुणवत्ता आणि हवामान अंदाज आणि संशोधन प्रणालीने (SAFAR) याबाबतची माहिती दिली आहे. थंडीचा कहर वाढत असतानाचा प्रदूषणाची पातळी वाढली आहे. त्यामुळे वाढत जाणारे प्रदूषण ही दिल्लीकरांसाठी धोक्याची घंटा आहे.
हवा गुणवत्ता आणि हवामान अंदाज आणि संशोधन प्रणालीने दिलेल्या माहितीमुसार नोएडातील हवा गुणवत्ता निर्देशांक देखील खराब श्रेणीत नोंदवला गेला आहे. त्याठिकाणी 293 हवा निर्देशांकाची नोंद करण्यात आली आहे. तर गुरुग्राममध्ये 225 हवा निर्देशांकाची नोंद झाली आहे. मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये देखील कडाक्याची थंडी आहे. शहरात थंडी असली तरी वायू प्रदूषणापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वायू प्रदूषणाची पातळी गेल्या आठवड्यात तीव्र होती. या आठवड्यात ती सामान्य झाली आहे. ही सामान्य प्रदुषणाची पाटळी येत्या दोन ते तीन दिवसांत खराब श्रेणीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशमधील इतर शहरांमध्ये देखील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) खराब होण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये सध्या कडाक्याची थंडी सुरू आहे. बिहारमधील शहरांमध्ये किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. तर कमाल तापमान हे 22 ते 25 सेल्सिअसपर्यंत आहे. हळूहळू येथील हवेच्या प्रदुषणात सुधारणा होत आहे. राजस्थानमध्ये सध्या थंडीचा कहर वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारत असल्याचे चित्र राजस्थानमध्ये दिसत आहे. राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये प्रदुषणाची पातळी सामान्य आहे.
का खराब होतो हवा गुणवत्ता निर्देशांक?
हवा गुणवत्ता निर्देशांक हिवाळ्यात नेमका खराब का होतो. प्रदूषणाची पातळी का वाढते? याबाबत एबीपी माझाने उत्तर प्रदेश प्रदुषण कंट्रोल बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, हिवाळ्यामध्ये हवेचा प्रवाह थांबतो, त्यामुळे हवा एका ठिकाणी स्थिर होते. हवा एका ठिकाणी थांबल्याने जड होते, त्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांकांत वाढ होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
