एक्स्प्लोर

3200 कोटींच्या टीडीएस घोटाळ्याचा आयकर विभागाकडून पर्दाफाश

आपल्या कर्मचाऱ्यांचा टीडीएस कापून घेतला, मात्र तो सरकारकडे जमाच न करणाऱ्या 447 कंपन्यांचा आयकर विभागाने पर्दाफाश केला. या कंपन्यांनी कर्मचाऱ्याच्या टीडीएसचा वापर व्यवसायात गुंतवणुकीसाठी केला.

मुंबई : देशात सतत समोर येणाऱ्या बँकांतील कर्ज घोटाळ्यानंतर आता आयकर विभागने 3200 कोटींचा टीडीएस घोटाळा उघड केला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांचा टीडीएस कापून घेतला, मात्र तो सरकारकडे जमाच न करणाऱ्या 447 कंपन्यांचा आयकर विभागाने पर्दाफाश केला. या कंपन्यांनी कर्मचाऱ्याच्या टीडीएसचा वापर व्यवसायात गुंतवणुकीसाठी केला. सूत्रांच्या माहितीनुसार, आयकर विभागाच्या टीडीएस विभागाने कंपन्यांविरोधात चौकशी सुरु केली आहे, तर अनेक प्रकरणांमध्ये वॉरंट जारी करण्यात आला आहे. प्राप्तीकर कायद्यांतर्गत या प्रकरणात तीन महिन्यांच्या कारावासापासून ते दंडासहित सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. आरोपी कंपन्या आणि मालकांविरोधात आयटी अॅक्टच्या सेक्शन 276बी अंतर्गत कारवाई केली जात आहे. आयकर विभाग फसवणूक आणि फौजदारी खटलेही दाखल करत आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली असल्यामुळे कठोर कारवाई केली जाणार आहे. आरोपींमध्ये एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचाही समावेश असून, त्याचा राजकारणाशी संबंध आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापण्यात आलेला 100 कोटींचा टीडीएस या बिल्डरने आपल्याच व्यवसायात गुंतवला. इतर आरोपींमध्ये प्रोडक्शन हाऊसपासून ते इन्फ्रा कंपन्यांच्या मालकांचा समावेश आहे. ‘कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे टीडीएसचे 3200 कोटी कापले, पण ते सरकारी खात्यात जमा केलेच नाहीत. नुकत्याच झालेल्या पडताळणीत अशी 447 प्रकरणं समोर आली. काही जणांवर अटकेची कारवाई केली जाणार आहे’, अशी माहिती आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिली. हा आकडा एप्रिल 2017 ते मार्च 2018 पर्यंतचा आहे. आयकर विभागाने वसुलीची कारवाई सुरु केली असून संबंधित कंपन्यांची बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ‘अनेक प्रकरणांमध्ये कंपन्यांनी टीडीएसचा पैसा मुख्य भांडवलात वापरला. काही जणांनी माफी मागितली असून पैसे फेडण्याचं आश्वासन दिलं आहे. बाजारात सध्या योग्य परिस्थिती नसल्याने पैसे देणं शक्य होणार नाही, असं काहींचं म्हणणं आहे. अनेक प्रकरणात कंपन्यांनी कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या टॅक्सचा अर्धा भाग सरकारी खात्यात वळवला आहे आणि उर्वरित भाग चुकीच्या कामासाठी वापरला’, अशी माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget