(Source: Poll of Polls)
CJI IIT Madras Speech : 'तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांशी गैरवर्तन केले जात आहे'; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केली चिंता
CJI IIT Madras Speech : IIT मद्रासच्या दीक्षांत समारंभात, मुख्य न्यायाधीश DY चंद्रचूड यांनी AI च्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली.
CJI IIT Madras Speech : आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे IT क्षेत्रात नवीन क्रांती म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, भारताचे सरन्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड यांनी शनिवारी (22 जुलै) टेक्नॉलॉजीच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली. डीवाय चंद्रचूड म्हणाले की, सोशल मीडियाने आपल्याला सर्व वयोगटातील लोकांशी संपर्क साधण्याची परवानगी दिली आहे. पण, या नवीन संप्रेषण साधनाने ऑनलाईन गैरवर्तन आणि ट्रोलिंगसारख्या नवीन वर्तनांना जन्म दिला आहे. तसेच, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) देखील गैरवापर, चुकीची माहिती पसरवली जात आहे. आयआयटी चेन्नईच्या 60 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
आयआयटी मद्रासच्या दीक्षांत समारंभात CJI चंद्रचूड म्हणाले की, आजकाल आपण सर्वजण टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत. पण, तरीही आपल्याला त्याबाबत अनेक प्रश्न आहेत. तांत्रिक क्षेत्रातील तुम्हा सर्वांसमोरील हे एक मोठं आव्हान आहे त्यावर मात करणं गरजेचं आहे.
चुकीच्या हेतूंसाठी गैरवापर होतोय
CJI चंद्रचूड म्हणाले की AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) मध्ये व्यक्तींचा गैरवापर, दिशाभूल, धमकावणे किंवा धमकावण्याची क्षमता आहे. नुकसानकारक हेतूंसाठी त्याचा गैरवापर रोखणे हे सर्वांसमोरील प्रमुख आव्हानांपैकी एक असेल. ऑनलाईन टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून यूजर्सच्या मनात भीती निर्माण करू नये.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारले, “आज मी तुम्हाला दोन प्रश्न विचारू इच्छितो जे तुम्ही स्वतःला विचाराल अशी मला आशा आहे. तुमचे तंत्रज्ञान कोणत्या मूल्याचे प्रतिनिधित्व करते आणि त्याच्या शक्यता काय आहेत?
'जेव्हा आपण भविष्याकडे वाटचाल करत आहोत, तेव्हा आपण हे पाहिलं पाहिजे की...'
सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, आपण भविष्याकडे वाटचाल करत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवाच्या विकासात कशी मदत करू शकतात हे पाहायला हवे. आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमुळे आपली काम करण्याची पद्धत बदलली आहे.
IIT मद्रासचे संचालक व्ही कामकोटी यांनी कार्यक्रमात सांगितले की, 60 व्या दीक्षांत समारंभात 2,571 विद्यार्थ्यांनी पदवी पूर्ण केली आहे. त्याच वेळी, 453 डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे, त्यापैकी 19 परदेशी विद्यापीठांसह संयुक्त पदवी प्रदान करण्यात आली आहे. संस्थेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी सांगितले की, येथील संशोधनावरील खर्च मागील वेळी 250 कोटी रुपयांवरून 1,000 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :