'आहार' हेच 56 टक्के आजारांचे कारण, ICMR ने जाहीर केली मार्गदर्शक तत्वे
बदलत्या जीवशैलीचा आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार एकूण आजारांपैकी 56.4 टक्के आजार हे आपल्या आहारामुळं होतात.
Unhealthy Diet : दिवसेंदिवस माणसांचे जीवनमान बदलत चालले आहे. या बदलत्या जीवशैलीचा आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार एकूण आजारांपैकी 56.4 टक्के आजार हे आपल्या आहारामुळं होतात. याबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (Indian Council of Medical Research) मार्गदर्श सूचना जारी केल्या आहेत. यामुळं आजाराला आपण प्रतिबंध करु शकतो.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात अजूनही कुपोषण आणि ॲनिमिया या आजारासारख्या सार्वजनिक आरोग्य समस्या आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळं भारतात लठ्ठपणाच्या समस्या वाढत आहेत. याला वेळीच आळा घालणं गरजेचं आहे, अन्यथा भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.
लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या लक्षणांचा धोका वाढतोय
दरम्यान, ICMR निरोगी आहारासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या विविध आजारांना (NCDs) प्रतिबंध करण्यासाठी आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणातील मुले पोषणाच्या कमतरतेने त्रस्त आहेत. याशिवाय, अनेक राज्यांमध्ये जास्त वजन, लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या लक्षणांचा धोका वाढत आहे. साखर आणि मीठ असलेल्या पदार्थाचं प्रमाण वाढत आहे. हे पदार्थ सहज उपलब्ध होतात. या पदार्थाच्या अतिसेवनामुळं आजारांचं प्रमाण वाढत आहे.
कमी मीठ, कमी तेल खाणे, व्यायाम करणं गरजेचं
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) ने दिलेल्या माहितीनुसार कमी मीठ खाणे, कमी तेल खाणे, व्यायाम करणं गरजेचं आहे. तसेच साखर, अति प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खावे. लठ्ठपणा टाळण्यासाठी आरोग्यवर्धक पदार्थ खाणे गरजेचं आहे. पौष्टिक समृध्द अन्नपदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. आहाराच्या सवयींमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. यामुळं देखील आजारांमध्ये वाढ झाली आहे. आहाराबाबत स्वत:ला योग्य सवयी लावून घेणं गरजेचं आहे.
आहारामध्ये कडधान्ये, फळे भाजीपाला असणं गरजेचं
5 ते 9 वर्षे वयोगटातील 34 टक्के मुले उच्च ट्रायग्लिसराइड्सने ग्रस्त आहेत. संतुलित आहारामध्ये ज्वारी, बाजरी, भरड धान्य (millets) आणि कडधान्याचा वापर करणे गरजेचे आहे. काजू, भाज्या, फळे आणि दूध यांचे सेवन करावे. पोषक घटकांचे कमी सेवन होत आहे. ते सेवन वाढवणे गरजेचे आहे. तसेच डाळी, कडधान्यांचा (Mllets) जास्त वार करावा हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
महत्वाच्या बातम्या:
आरोग्य सेवेवरील खर्च कमी होणार, 100 औषधे होणार स्वस्त; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )