(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केरळमध्ये होम कॉरंटाईन असलेल्या IAS अधिकाऱ्याचे पलायन केल्याने निलंबन
केरळ राज्यातील कोल्लमचा उप-जिल्हाधिकारी होम कॉरंटाईन असताना पळून गेल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याचं निलंबन करण्यात आलं आहे.
कोची : होम कॉरंटाईन असताना पळून गेलेले अनेक घटना तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. मात्र, केरळमध्ये चक्क एक आयएएस अधिकारीच पळून गेल्याचं समोर आलंय. होम कॉरंटाईन असलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याने नियम तोडून घरी पलायन केल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत निलंबन करण्यात आलं आहे. तो नुकताच परदेशातून हनिमूनवरुन आला होता. देशातील कोरोना व्हायरसच्या संकटामुळे त्याला होम कॉरंटाईन राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्याने नियमांचे उल्लघन करत तिथून पळ काढला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. कोल्लमचे उप-जिल्हाधिकारी अनुपम मिश्रा असं पलायन केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्लमचे उप-जिल्हाधिकारी अनुपम मिश्रा असं या अधिकाऱ्याचे नाव असून तो मूळाचा उत्तर प्रदेशचा आहे. आरोग्य विभागाच्या अहवालाच्या आधारे कोल्लमचे पोलीस अधीक्षक टी नारायणन यांनी ही माहिती दिली. अनुपम मिश्रा हा मलेशिय-सिंगापूरला हनिमूनसाठी गेला होता. तो 19 मार्चला केरळला परतला. त्यावेळी त्याला प्रोटोकोलप्रमाणे निरिक्षणाखाली ठेवण्यात आले. सोबतच त्याच्या अंगरक्षकाला निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. कोरोनाची कोणतीही लक्षणे न जाणवल्याने त्याला होम कॉरंटाईन राहण्यास सांगितले. मात्र, कोणालाही न सांगता त्याने बंगळुरू सोडले. ज्यावेळी त्याच्याशी संपर्क साधला त्यावेळी मी बंगळुरुमध्येच असल्याचे त्याने खोटं सांगितले. मात्र, त्याने कुटुंबासोबत बंगळुरू सोडल्याची माहिती नासेर यांनी दिली. मात्र, पोलिसांनी मिश्राचे मोबाईल लोकेशन चेक केले असता तो उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये असल्याचे समजले.
Coronavirus | प्रिन्स चार्ल्सनंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनाही कोरोनाची लागण
बेजबाबादार अधिकारी अनुपम मिश्रा याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र, त्याला केरळच्या आरोग्य विभागाने घरीच राहण्यास सांगितले होते. सध्या देशातील वातावरण खूप गंभीर आहे, सर्वांनीच याबाबतीत काळजी घ्यायला हवी. मात्र, अनुपम मिश्रा याने होम कॉरंटाईनच्या सूचना असताना त्याचे उल्लघन केलं. कोणत्याही अधिकारी किंवा प्रशासनाला न कळवता कुटुंबासह घर सोडले. त्यामुळे त्याच्याविरोधात कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, केरळमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधिक 126 रुग्ण सापडेल आहेत. केरळचे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी राज्यातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी 20 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यापैरी 500 कोटी हे कोरोना संकटाशी लढण्यासाठी ठेवले आहे.
Coronavirus | जर्मनी सरकार कशी हाताळतंय कोरोनाची परिस्थिती? बर्लिनमधून मराठमोळं दाम्पत्य लाईव्ह