एक्स्प्लोर
Advertisement
ट्रेनसमोर धोकादायक सेल्फी घेण्याचा नाद तरुणाच्या अंगलट
ट्रेनच्या धडकेत शिवा गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
हैदराबाद : धोकादायक सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात कित्येक जणांचे जीव गेल्याच्या घटना वारंवार समोर येत असूनही अनेकांच्या डोक्यातलं खूळ कमी झालेलं नाही. हैदराबादमध्ये ट्रेन जात असलेल्या ट्रॅकशेजारी उभं राहून सेल्फी घेण्याचा प्रयत्न तरुणाच्या अंगलट आला आहे. ट्रेनच्या धडकेत शिवा नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
शिवाच्या या डेंजरस स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एमएमटीएस ट्रेन येत असताना ट्रॅकच्या शेजारी शिवा उभा होता. स्मार्टफोन हातात घेऊन कॅमेरात बघून तो हसत होता, तर उजव्या हाताने ट्रेनकडे बोट दाखवत होता. मागून ट्रेन येत होती आणि त्याला सावध करण्यासाठी लोको पायलट सातत्याने हॉर्न देत होता. मात्र तरीही शिवा तिथून बाजूला सरकला नाही.
अखेर ट्रेन जवळ आली आणि त्याला धडक देऊन निघून गेली. त्याच्या जवळपास असणाऱ्यांचे चित्कार आणि गडबड व्हिडिओमध्ये ऐकू येतात. व्हिडिओमध्ये त्याला धडक बसतानाची दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात.
ट्रेनच्या धडकेत शिवा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या उदाहरणावरुन असे जीवघेणे सेल्फी घेण्याचे प्रयत्न करु नका, तुमच्या जीवापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही, असं आवाहन केलं जात आहे.
व्हिडिओ : दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
मुंबई
भारत
महाराष्ट्र
Advertisement