आर्मी कॅन्टीनमध्ये किती स्वस्तात मिळतं सामान? कोणत्या वस्तूंवर मिळते जास्त सूट? पाहा....
Army Canteen: सीमेवर लढणाऱ्या जवानांना भारत सरकारद्वारे स्वस्त दरात वस्तू पुरवल्या जातात. आर्मी कॅन्टीनमधून सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात, काय आहे हे आर्मी कॅन्टीन आणि यातून किती सवलत मिळते? पाहूया...
Army Canteen: सीमेवर भारतीय सैन्य (Indian Army) ज्या शौर्याने आपले रक्षण करते त्याचे ऋण कोणीही फेडू शकत नाही. तथापि, भारत सरकार (Government Of India) आपल्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्या बदल्यात अनेक सुविधाही पुरवते, त्यापैकी एक म्हणजे 'आर्मी कॅन्टीन'. या कॅन्टीनमध्ये तुम्हाला प्रत्येक वस्तूवर बाजारात मिळणाऱ्या वस्तूंपेक्षा जास्त सूट दिली जाते. वास्तविक, लष्करी जवानांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधेला कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट (CSD) म्हणतात, ज्याला रोजच्या बोलण्याच्या भाषेत आर्मी कॅन्टीन म्हणून उल्लेखतात.
हे आर्मी कॅन्टीन नक्की काय आहे?
आर्मी कॅन्टीन, म्हणजेच CSD संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते, ज्याद्वारे जवानांना कमी दरात सर्व वस्तू पुरवल्या जातात आणि हा भारत सरकारचा उपक्रम आहे. सर्व प्रमुख लष्करी तळांवर आर्मी कॅन्टीन स्टोअर उघडले आहेत आणि हे कॅन्टीन सशस्त्र दलांचे कर्मचारी चालवतात. देशातील वेगवेगळ्या मिलिटरी स्टेशनवर CSD डेपो आहेत आणि तेथून URC ला (Unit Run Canteen) मालाचा पुरवठा केला जातो.
किती लोकांना मिळतोय लाभ?
आर्मी कॅन्टीनमधून मिळत असलेल्या फायद्यांबद्दल सांगायचे झाले तर, आर्मी कॅन्टीनच्या माध्यमातून 1 कोटींहून अधिक लोकांना लाभ मिळत आहे, ज्यात आर्मी (Army), एअर फोर्स (Air Force) आणि नेव्हीचे (Navy) कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब (Family), तसेच माजी सैनिक (Ex-Army Employees) आणि त्यांच्या कुटुंबाचा समावेश आहे. या कॅन्टीनमध्ये प्रत्येक लहान-मोठ्या वस्तू मिळतात आणि बाजारातील दरापेक्षा अगदी स्वस्त दरात या वस्तू मिळतात. लेह ते अंदमानपर्यंत आर्मी कॅन्टीनचे सुमारे 33 डेपो आहेत आणि सुमारे 3700 युनिट रन कॅन्टीन (URC) आहेत.
कोणत्या वस्तूंवर मिळते अधिक सूट?
किराणा सामान, स्वयंपाक घरातील उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स, दारू आणि ऑटोमोबाईल्स यासारख्या अनेक प्रकारच्या वस्तू प्रामुख्याने आर्मी कॅन्टीनमध्ये स्वस्त दरात उपलब्ध आहेत. आर्मी कॅन्टीनमध्ये काही विदेशी वस्तूही उपलब्ध आहेत आणि आर्मी कॅन्टीनमध्ये दारू, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर सर्व वस्तूंवर बरीच सवलत दिली जाते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लाभार्थी खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही मालाची आर्मी कॅन्टीनमधून मागणी करू शकतात.
आर्मी कॅन्टीनमध्ये जास्त सवलत का मिळते?
आर्मी कॅन्टीनमध्ये सरकार जीएसटी करात 50 टक्के सूट देते. म्हणजेच 5, 12, 18 आणि 28 टक्के जीएसटीचे कमाल दर या कॅन्टीनमध्ये निम्मे करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, बाजारातील कोणत्याही वस्तूवर 5 टक्के GST आकारला गेला तर तो कॅन्टीनसाठी 2.5 टक्के असेल. यामुळेच येथे वस्तू अतिशय स्वस्तात मिळतात.
हेही वाचा: