एक्स्प्लोर
भाजपच्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या 'शक्तीमान'चा मृत्यू
देहरादून : उत्तराखंडच्या देहरादूनमधील भाजपच्या आंदोलनादरम्यान जखमी झालेला शक्तीमान घोड्याचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून शक्तीमानवर औषधांवर परिणाम होत नव्हता. शिवाय त्याच्या हालचालीही बंद झाल्या होत्या, असं डॉक्टरांनी सांगितलं.
भाजप आमदार गणेश जोशी यांच्या आंदोलनादरम्यान शक्तीमानच्या पायाला दुखापत झाल्याने त्याचा पाय कापावा लागला होता. त्यानंतर शस्त्रक्रिया करुन शक्तीमानला अमेरिकेतून मागवलेला कृत्रिम पाय बसवण्यात आला होता. शक्तीमान बरा होऊन पुन्हा धावू शकेल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला होता. मात्र बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
'शक्तिमान'वरील हल्ल्याने विराट कोहली संतापला
शक्तीमानच्या मृत्यूचं राजकारण हरिश रावत सरकार शक्तीमानच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. देश-परदेशातील तज्ज्ञांना बोलावून वेळेवर शक्तीमानवर उपचार केले असते, तर तो कदाचित जिवंत असता, असं भाजप प्रवक्ते मुन्ना सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. तर हरीश रावत म्हणाले की, मला या राजकारणात पडायचं नाही. या राजकीय टिप्पणी करुन शक्तीमानच्या वीरमरणाचं महत्त्व कमी करणार नाही. त्याच्या मृत्यूच्या वृत्ताने मला धक्का बसला आहे.भाजपच्या आंदोलनाचा फटका घोड्याला, 'शक्तिमान'चा पाय कापला
भाजप आमदारावर गुन्हा दरम्यान, शक्तीमानला मारहाण केल्याप्रकरणी गणेश जोशींवर गुन्हा दाखल झाला आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement