एक्स्प्लोर
हिटलर आणि मुसोलिनी हेही शक्तीशाली ब्रॅण्ड होते: राहुल गांधी

नवी दिल्ली: हरियाणातील भाजप नेते अनिल विज यांनी आज वादग्रस्त वक्तव्य करुन देशातील जनतेचा रोष ओढावून घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी चांगला समाचार घेतलाच, पण भाजपनेही विज यांच्या या वक्तव्याची निंदा केली आहे.
आता यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही टीका करताना, जर्मनीचा हुकूमशाह हिटलर आणि मुसोलिनी हेही शक्तीशाली ब्रॅण्ड असल्याचं म्हणलं आहे. विज यांच्या वक्तव्यचा निषेध करण्यासाठी राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. विज यांनी जेव्हापासून नोटांवर महात्मा गांधींची प्रतिमा आली आहे, तेव्हापासूनच नोटांचं अवमूल्यन झाल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर सर्वच बाजूंनी टीका सुरु आहे. संबंधित बातम्या खादीच नाही नोटांवरुनही गांधीजी गायब होतील : अनिल विजHitler and Mussolini were also very powerful brands https://t.co/BdDQtsX0gE
— Office of RG (@OfficeOfRG) January 14, 2017
खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर, डायरीवर गांधींऐवजी मोदींचा फोटो
गांधींचा फोटो हटवणं म्हणजे मोदींची हुकूमशाहीकडे वाटचाल : शिवसेना
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement























