Hindu Sisters Donate Land : दोन हिंदू बहिणींच्या कर्तृत्वाची सर्वत्र चर्चा! ईदगाहसाठी दान केली दीड कोटींची जमीन, वाचा सविस्तर
Hindu Sisters Donate Land : जातीय सलोख्याचे उदाहरण मांडत दोन हिंदू बहिणींनी मुस्लिम बांधवांना ईदची भेट दिली आहे.
Hindu Sisters Donate Land : जातीय सलोख्याचे उदाहरण मांडत दोन हिंदू बहिणींनी मुस्लिम बांधवांना ईदची भेट दिली आहे. आपल्या दिवंगत वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी, दोन हिंदू बहिणींनी ईदच्या पार्श्वभूमीवर ईदगाहच्या विस्तारासाठी दीड कोटी रुपयांहून अधिक किंमतीची आपली जमीन दिली.
दोन बहिणींची चर्चा..!
काशीपूरसह देशात हा चर्चेचा विषय आहे. या भगिनींच्या कर्तृत्वाचे मुस्लिम कमिटीकडून कौतुक करण्यात येत आहे. मुस्लिम बांधवांकडून दोघींच्या दिवंगत वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थनाही करण्यात आली. दरम्यान, देशाच्या विविध भागांतून जातीय तणावाच्या बातम्या येत असताना, उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर या छोट्याशा शहरात दोन बहिणींचा हा औदार्य चर्चेचा विषय ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वीस वर्षांपूर्वी मृत्यूपूर्वी ब्रजानंदन प्रसाद रस्तोगी यांनी जवळच्या ईदगाहच्या विस्तारासाठी त्यांची चार बिघा शेतजमीन दान करायची असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांना सांगितले होते.
शेवटची इच्छा सांगण्याआधीच निधन
रस्तोगी यांचे जानेवारी 2003 मध्ये मुलींना शेवटची इच्छा सांगण्याआधीच वडिलांचे निधन झाले. दिल्ली आणि मेरठमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहणाऱ्या सरोज आणि अनिता या मुलींना त्यांच्या वडिलांची इच्छा नुकतीच कळली, म्हणून त्यांनी ताबडतोब काशीपूरमध्ये राहणारा त्यांचा भाऊ राकेश यांच्याशी संमती मिळवण्यासाठी संपर्क साधला. राकेशनेही लगेच होकार दिला.
ईदगाह समितीकडून दोघी बहिणींचे कौतुक
राकेश रस्तोगी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वडिलांच्या शेवटच्या इच्छेचा आदर करणे हे आमचे कर्तव्य आहे. माझ्या बहिणींनी वडिलांच्या आत्म्याला शांती मिळेल असे कर्तृत्व केले आहे. ईदगाह कमिटीचे हसीन खान म्हणाले, "दोन्ही बहिणी जातीय एकतेचे जिवंत उदाहरण आहेत. ईदगाह समिती त्यांच्या या उदारतेबद्दल त्यांचे आभार मानते. दोन्ही बहिणींचे अभिनंदन." असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: