एक्स्प्लोर
उत्तर भारतात पावसाचा कहर, आसाममध्ये पुरामुळे 47 जणांचा मृत्यू

गुवाहाटी : आसाम, उत्तर प्रदेश आणि बिहार या तीन राज्यांना पावसानं चांगलाच तडाखा दिला आहे. पूरपरस्थितीमुळं या तिन्ही राज्यातील लाखो नागरिकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आसाममधील पूरपरस्थितीचा आढावा घेतला.
पुरामुळं आसाममधील 19 लाख नागरिक बाधित झाले असून 5 लाख जणांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर कऱण्यात आलं आहे. दरम्यान पुरामुळं आसाममधील 25 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
तिकडे बिहारमधीलही अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. पुरानं बिहारमध्ये 26 जणांचा बळी घेतलाय. महानंदा नदीसह प्रमुख नद्यांना पूर आल्यामुळं परिस्थिती चांगलीच बिकट झाली आहे.
बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशालाही पावसानं चांगलाच तडाखा दिलाय. सरकारनं उत्तरप्रदेशमध्ये 41 आपत्ती व्यवस्थापनं केंद्र उभारली असून, पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्य़ासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
