एक्स्प्लोर

गोव्यातील धरणे फुल्ल, पावसाची बॅटिंग सुरुच

गोव्यातील सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. साळावली, अंजुणे, आमठाणे व पंचवाडी ही धरणे फुल्ल झाली आहेत. त्यामुळे धरणाचे दरवाजे खोलण्यात आले असून राज्य सरकारने जनतेला पूरसदृष्य परिस्थितीबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे.

गोवा : गेल्या पाच दिवसांपासून पावसाने सुरु केलेले धूमशान काही केल्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. काल मंगळवारीही संपूर्ण राज्याला पावसाने झोडपून काढले. 21 सप्टेंबरपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पणजी वेधशाळेने व्यक्त केला आहे. गोव्यातील सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. साळावली, अंजुणे, आमठाणे व पंचवाडी ही धरणे फुल्ल झाली आहेत. त्यामुळे धरणाचे दरवाजे खोलण्यात आले असून राज्य सरकारने जनतेला पूरसदृष्य परिस्थितीबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. परतीच्या पावसाने राज्यात सर्वत्र थैमान घातलेले आहे. सोमवारी रात्री उशिरा सुरु झालेला पाऊस बुधवारी दुपारपर्यंत सर्वत्र चालू होता. पेडण्यात सर्वाधिक 11 से. मी. पावसाची नोंद झाली आहे. परतीच्या जोरदार पावसामुळे गेल्यावर्षीची सरसरी भरून काढण्यासाठी आता फक्त 15 इंच पावसाची गरज आहे. वाळपईत पावसाने 132 इंच पूर्ण केले आहे. साखळीत पावसाने शतक गाठले. पेडणे, म्हापसा दोन्ही ठिकाणी आज पाऊस शतक ओलांडण्याची शक्यता आहे. पावसाने यावर्षीच्या सरासरी गाठण्याच्या उद्दिष्टापर्यंत मजल मारली असून पुढील दोन दिवसात राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. सध्याच्या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे भातशेती धोक्यात आलेली आहे. राज्यातील जोरदार पडणाऱ्या पावसामुळे सर्व धरणे पाण्याने पूर्णत: भरली असून अणजुणे धरणाचे चारही दरवाजे खोलण्यात आले आहेत. यामुळे साखळीत वाळवंटी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. पावसाचा जोर वाढला तर पुराची शक्यता असल्याने राज्य सरकारने जनतेला सावधानतेचा इशारा दिलेला आहे. वादळी वारे आणि जोरदार पाऊस यामुळे समुद्र खवळलेला असून पर्यटकांनी समुद्रात पोहण्यासाठी पुढील 4 दिवस उतरु नये असे आवाहन किनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नमलेल्या दृष्टि या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.पर्यटक पावसाचा आनंद लूटत किनाऱ्यांपर्यंत येत असले तरी हवामान लवकर सुधरो आणि समुद्र स्नान करण्यास मिळो अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
US China Trade War : ट्रम्प-शी जिनपिंग भेटीनंतर मोठा गेम प्लॅन! अमेरिका-चीनकडून 60 अब्ज डॉलरचा करार; भारताची चिंता का वाढली?
ट्रम्प-शी जिनपिंग भेटीनंतर मोठा गेम प्लॅन! अमेरिका-चीनकडून 60 अब्ज डॉलरचा करार; भारताची चिंता का वाढली?
मोठी बातमी! महाराष्ट्राचा 'दुष्काळ' दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली
मोठी बातमी! महाराष्ट्राचा 'दुष्काळ' दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Sanjay Raut: ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
Sudhir Raut : अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
Election Commission: इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
Matang Morcha: मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांनी काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांनी काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
Chanakya Niti: आयुष्यात कोणत्या प्रसंगी गप्प राहावे? मौनपणा कधी शहाणपणाचा ठरतो? चाणक्यनीती सांगते...
आयुष्यात कोणत्या प्रसंगी गप्प राहावे? मौनपणा कधी शहाणपणाचा ठरतो? चाणक्यनीती सांगते...
Embed widget